Skip to main content

"अंध:श्रद्धा एक शाप" essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक मराठी निबंध

  "अंध:श्रद्धा एक शाप" वैचारिक मराठी निबंध 

                                 


 "अंध:श्रद्धा एक शाप" हा एक कल वैचारिक निबंध आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला "अंध:श्रद्धा एक शाप" हा निबंध वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.

अंध:श्रद्धा एक शाप  

    आपला भारत एक महान देश आहे. आपल्या देशाची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. आपल्या देशाचा इतिहास फार प्राचीन आहे. आपल्या या विशाल देशात रूढी, प्रथा, परंपरा, सणवार, उत्सव, विविध प्रांतात, विविध पध्दतीने साजरे केले जातात. विविध जातिधर्मातील पध्दती वेगवेगळ्या आहेत. यातूनच भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवनपध्दती विकसित झालेली आहे.  मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याच्या मूलभूत गरजा समाजात भागविल्या जातात आणि त्याच्या इतर गरजांची पूर्तताही समाजातच पूर्ण होत असते. परंतु प्रत्येक मनुष्य हा कर्तृत्वाने, प्रयत्नाने, बळाने, पैशाने, बुद्धीने परिपूर्ण असतोच असे नाही. बऱ्याच वेळेस त्याने केलेल्या कार्यात यशाच्या ऐवजी त्यास अपयश जेंव्हा येते तेंव्हा तो दैववादी बनतो त्यातूनच श्रध्दा आणि अंध:श्रध्दा निर्माण होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची एखाद्या व्यक्तीवर, परमेश्वरावर गाढ निष्ठा बसते तेंवहा त्याला श्रध्दा म्हणतात. आणि जेंव्हा श्रध्देचा अतिरेक होतो, योग्य-अयोग्य यांचा विचार न करता अज्ञानाने एखादी गोष्ट करणे म्हणजे अंधश्रध्दा. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, सारासार विचार न करणे, देवभोळेपणा, भाबडेपणा, अज्ञान यातूनच अंधश्रध्देचा उगम झालेला आहे. 

     अंध:श्रध्दा आणि अज्ञान ही समाजाला लागलेली कीड आहे. तो एक शाप आहे. २१ व्या शतकात सुद्धा विज्ञानाबरोबर अज्ञानही समाजात दिसत आहे. विशिष्ट मनोकामना पूर्ण करण्यासाठी यज्ञात आहूती देणे, पशुबळी देणे, रोग निवारणासाठी गडेदोरे, मंत्रतंत्र अंगारे धुपारे यांचा वापर करणे. कर्मकांडाच्या नावाखाली विविध प्रकारचे अतिरेकी प्रकार करणे, भूतबाधा, पिशाच्छ बाधा होते म्हणून उतरवून टाकणे, दान देणे अशा गोष्टी भोंदू बाबांच्या मार्गदर्शनातून केल्या जातात. जादूटोणा करून लोकांना फसविले जाते. बुवाबाजी व भोंदुगिरी वाढत आहे. एका पिंजऱ्यातील पोपटाला आपले भविष्य सांगता येते आणि त्याच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवतो आणि आलेल्या भविष्यावर विचार करत बसतो हा केवढा अज्ञानाचा कळस होय. दर अमावस्येला मिरच्या, बिब्बे, लिंबू वाहनाला लावणे. घर बांधल्यानंतर घरावर काळी बाहुली अडकावणे ही सुद्धा अंध श्रध्देचीच उदाहरणे आहेत. केसात जट झाल्यानंतर मुलीला देवीला सोडले जाते. वाघ्या, मुरळी देवाच्या नावाने अर्पण करणे असे प्रकार ठिकठिकाणी दिसतात. डोक्याचे केस वाढवून देवाला सोडलेल्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याला त्याचे आई-वडीलच जबाबदार असतात.  

     देवावर आणि दैवावर श्रध्दा असावी, परमेश्वराच्या समोर नतमस्तक व्हावे, आपल्यासमोर असलेले आदर्श जीवनात मार्गदर्शक ठरावेत, आपल्याला मानसिक समाधान मिळावे, आपला आत्मविश्वास वाढावा, आपल्या प्रयत्नांना यश यावे यासाठी कोणत्याही गोष्टीवर श्रध्दा असावी परंतु अंधश्रध्दा नसावी. डोळे असून आंधळे होऊ नये, त्यामुळे समाज विनाशाकडे खेचला जातो. 'विनाशकाली विपरित बुध्दी' असे होते. अशी अंधःश्रध्दा पूर्वीपासूनच दिसते. संत तुकारामांनी अशा भोंदू साधूवर परखडपणे टीका केली आहे ते म्हणतात,  

"ऐसे कैसे झाले भोंदू , कर्म करूनी म्हणती साधू 

अंगी लावूनीया राख, डोळे झाकून करिती पाप 

 दावूनि वैराग्याचा कळा, भोगी विषयाचा सोहळा" 

अशा प्रकारच्या अभंगातून समाजप्रबोधन करण्याचे कार्य संत तुकारामांनी केले आहे. 

    धर्माच्या नावावर चाललेला अधर्म, भोळ्याभाबड्या भाविकांच्या श्रध्देशी खेळणारे भोंदू बाबा, त्यांचे मठ वा आश्रम. हे समाजात अध्यात्मिक वा धार्मिक भ्रष्टाचाराची केंद्रे बनली आहेत. या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी समाजातील प्रत्येक मानवाने पुरोगामी विचारसरणी व विज्ञाननिष्ठ वृत्ती जोपासली पाहिजे. लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे. “लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडा पाषाण' अशा बाबांच्या ढोंगी प्रकाराला सुरूंग लावला पाहिजे. अंध श्रध्दा आणि निरर्थक चालीरीती यांचा त्याग करून ज्ञानाची उपासना केली पाहिजे. ज्ञानाच्या बळावर वस्तुस्थितीचे आकलन करुन घेतल्याशिवाय आपला विकास होणार नाही असे ज्येष्ठ विचारवंत गो.ग. आगरकरांनी आपल्या निबंधातून विचार प्रभावीपणे मांडला आहे. महाराष्ट्रात अंध:श्रध्दानिर्मूलन समिती लोकांमधील अंध:श्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या समितीच्या शाखा शहरा-शहरातून कार्य करत आहेत. परंतु त्यास जनतेचे म्हणावे तितके सहकार्य मिळत नाही म्हणूनच पशुबळीबरोबरच नवजात अर्भकाचे बळी देण्याच्या घटना वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. आणि विशेष करुन या अंध:श्रध्देला बळी पडलेल्यांमध्ये स्त्रियांचा जास्त समावेश आहे. त्यांचे अज्ञान, अशिक्षितपणा, सुसंस्काराचा अभाव आणि बहुतांश भौतिक प्रगतीची माहिती नसणे त्यामुळे स्त्रियाच बळीचा बकरा बनत आहेत. याच्यासाठीच साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे. मुलगी म्हणून तिला दिली जाणारी वागणूक बदलली पाहिजे. संकुचित दृष्टिकोन बदलून व्यापक विचार केल्यास अंध:श्रध्दांचा जन्मच होणार नाही. 

-समाप्त-

मित्रांनो "अंध:श्रद्धा एक" या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Also read : 

1) शेतकऱ्याची आत्मकथा

2) मन करा रे प्रसन्न

3) माझी आई निबंध 

Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन