Skip to main content

भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंधलेखन | Essay in Marathi

 "भूकंपग्रस्ताचे मनोगत" आत्मकथानात्मक मराठी निबंध"भूकंपग्रस्ताचे मनोगत" हा एक कल आत्मकथानात्मक निबंध आहे. आत्मकथानात्मक निबंधात आपल्याला एखाद्या घडलेेल्या गोष्टीचे वर्णन करायचे असते. खाली दिलेला "भूकंपग्रस्ताचे मनोगत" हा निबंध आत्मकथानात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.

 भूकंपग्रस्ताचे मनोगत निबंध

 आज अनंतचतुर्दशी, गणपती बाप्पाला निरोप, वाजत गाजत निघालेल्या मिरवणुका, झांज, लेझीम, बर्थी पथकांची नयनरम्य सादर केलेली नृत्ये, गुलालांची उधळण, विसर्जनाच्या ठिकाणी "सूखकर्ता दु:खहर्ता...' ही दुमदुमणारी आरती आणि गणरायाला दिलेला भावपूर्ण निरोप अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. संपूर्ण महाराष्ट्राला दु:खाच्या सागरात लोटणारा भूकंप झाला. लातूर शहरातील किल्लारी परिसरातील ३० सप्टेंबरची रात्र ही काळरात्र ठरली. असा साश्रू नयनांनी विचार करत असलेला समीर माझ्याशी बोलत होता.  

समीर पुढे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतो, 'त्या दिवशीचा पहाटे सव्वाचार वाजता झालेला भूकंप खूप भयंकर होता. धरणीकंप काय असतो ? आणि का होतो? मला तर हा शब्दच माहित नव्हता. त्या दिवशी पहाटे अचानक जमीन हादरू लागली. आमचे खेडेगाव, जुने वाडे, माती दगडांची घरे होती. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. सगळीकडे मातीचे लोटच्या लोट उसळले. घरे उद्ध्वस्त झाली. काय करावे काही सुचेना. एकच हाहा:कार माजला. आरडा, ओरडा गोंधळ सुरू झाला. प्रत्येक घरातील कुणीना कुणी त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते, चेंगरले होते. त्यात माझे आई, बाबा, माझी छोटी बहीण यांनी या जगाचा निरोप घेतला. मी शेवटी काय करणार होतो ? त्यांच्या संरक्षणासाठी मी काही करू शकलो नाही. निसर्गच कोपला होता. त्याच्यापुढे मी एक सामान्य माणूस हतबल होऊन बसलो होतो. 

 भूकंपाचे हादरे सारखे जमिनीला जसे बसत होते तसेच ह्रदयालाही तडे जात होते. मन सुन्न झालं होतं. संपूर्ण गावावरच स्मशानकळा पसरली होती. माणसांना मातीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी माणूसबळ कमी पडत होतं. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशात आणि जगात पसरली. लष्कराला पाचारण करण्यात आले, परंतु निसर्गाचं कोपणं, त्याचा प्रकोप किती महाभयंकर असू शकतो ते सांगण्यास शब्द अपुरे पडतील. भूकंपानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. असा धो-धो पाऊस येऊ लागला की, जमिनीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना काढण्यात अनंत अडचणी येऊ लागल्या. रात्रीतर विजेची पण सोय नव्हती. अशी वेळ कोणा वैऱ्यावर, शत्रूवरसुध्दा येवू नये असे वाटले. 

 अन्न, पाणी तर मिळाले नाही. झोपायलासुध्दा घर उरले नाही. अगदी रस्त्यावरच दिवस काढायची वेळ आली. घर म्हणजे निवारा, संरक्षणासाठी, मायेच्या प्रेमाच्या माणसांमध्ये जीवन काढण्यासाठी बांधलेली एक पवित्र वास्तू, एक मंदिर, परंतु त्याचा एक लवलेशही राहिला नाही. मंदिरातील देवतांचेच अस्तित्व नाहीसे झाले. जमिनीच्या आत झालेल्या अंतर्गत बदलामुळे माणसाचे आयुष्यच पार बदलून गेले. सरकारने मदत केली औषधाची, अन्नाची, घराची. परंतु न भरून निघणारी पोकळी मात्र मनात कायम 'घर' करून आहे.

  'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असाच मी एक अभागी आहे. माझ्यावरील आईबाबांचे छत्र हरवले तरी आजी-आजोबा, काका-काकू यांच्या छत्रछायेखाली मी वाढतो आहे. परंतु माझ्याबरोबर माझ्यापेक्षा अतिशय भयानक घटना मी पाहिल्या. एकेकाच्या घरातील तर एकजणही जिवंत राहिले नव्हते. स्मशानभूमीत सुध्दा मृतदेहांची रास होती. 

 “भूकंप सुध्दा जीवन घडवून गेला" असेही काहीसे चित्र दिसून आले. मिळणारी मदत, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करत असताना झालेला अन्याय सहनशीलतेच्या पलीकडचा आहे. चोऱ्याचे प्रमाण वाढले, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. अन्नधान्य, कपडालत्ता, सरकारकडून मिळालेली मदत सर्वांना समान मिळाली नाही. बऱ्याच जणांनी आपले हात धुऊन घेतले. अजूनही सरकारच्या मिळालेल्या योजनांपासून वंचितांची संख्या खूप आहे. सरकारी नोकरीत आरक्षण आहे; परंतु या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी 'निसर्ग माझा मित्र' मला वाटत नाही, कारण तो माझा शत्रू भासला. माझे आयुष्य, माझं हसतं खेळतं, भरलेलं घर उध्वस्त झालं. मनाला पडलेल्या या भेगा कधीही भरून न येणाऱ्या आहेत.

-समाप्त-

मित्रांनो "भूकंपग्रस्ताचे मनोगत" या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Also read : 

1) सूर्य नसता तर..निबंध

2) श्रमाचे महत्त्व निबंध

3)  मन करा रे प्रसन्न निबंध 

4)  वृक्षाचे महत्त्व निबंध

5) मला पंख असते तर.. निबंध


Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन