Skip to main content

हुंडा एक अनिष्ठ प्रथा essay in marathi | मराठी निबंधलेखन

 हुंडा एक अनिष्ठ प्रथा मराठी निबंध"हुंडा एक अनिष्ठ प्रथा" ही प्रथा पूर्वी पासून आपल्या भारतात आहे. लग्न म्हटलं की हुंडा हा प्रकार आलाच असे समजा. आज याच विषयावर विस्तारितपणे खाली निबंध दिलेला आहे. सगळे मुद्दे घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

 हुंडा एक अनिष्ठ प्रथा निबंध

 वर्तमानपत्र उघडले की, एखादी तरी हुंडाबळी ठरलेल्या स्त्रीची करुण कहाणी सांगणारी बातमी दिसते, आणि मन सुन्न होतं. दररोज कुठेना कुठे हुंडा घेण्यावरून वा देण्यावरून वादविवाद, त्यातून संघर्ष, संघर्षातून खून, मारामाऱ्या अशा घटनांची साखळीच दृष्टीस पडते. म्हणूनच की काय मुलगी झाली म्हटलं की आई-बापापासून इतर सर्व-जणच नाकं मुरडतात. मुलाचं स्वागत ज्या उत्साहानं, आनंदानं होतं तसं मुलीचं स्वागत होत नाही. सुशिक्षित असो वा अशिक्षित, दोन्ही वर्गात मुलींची हेळसांड होताना दिसते. जन्मल्या जन्मल्या मुलगी परक्याचं धन आणि मुलगा मात्र वंशाचा दिवा अशी मनाची धारणा असलेले माता पिता अज्ञानी, अविचारी असतात. मुलीला कमी लेखणे आणि मुलाला अति महत्त्व देणे यातूनच मुलींच्या भ्रूणहत्येपासून हुंडाबळीपर्यंत हत्येचे प्रमाण वाढलेले आहे.

  हुंडा म्हणजे विवाहाच्या वेळी वधूपित्याने वरदक्षिणा देणे. ही दक्षिणा मालमत्ता, पैसा, सोने आदी मौल्यवान वस्तू या कोणत्याही स्वरूपातील असू शकते. पूर्वी विवाहात दिलेली संपत्ती ही स्त्रीधन म्हणून ओळखले जात होती. आणि ही बाब ऐच्छिक होती परंतु आता ती सक्तीचीच झाली आहे. अगदी परवाच दूरदर्शनवर एक माहितीपट दाखविला. त्यात इंजिनियर नवरदेवाच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांच्या मागण्या ऐकून लोक कोणत्या थरापर्यंत पोहचू शकतात याची कल्पनाच न केलेली बरी. कारण या विवाहास योग्य वराची किंमत होती एक कोटी. एकाची ऐंशी लाख वगैरे आकडे ऐकूनच घेरी येईल. ज्यांच्याकडे पैसा आहे ते देतील परंतु गरिबांचे हाल बघवत नाहीत.

  हुंडा ही मुलीच्या बापावर असलेली टांगती तलवारच असते. प्रेमापोटी, मायेपोटी वस्तू देणे हा एक भाग परंतु सक्तीने पैसे मागणे हा भाग वेगळा . जास्त हुंडा देऊन मुलगी चांगल्या घरात देण्याच्या वधूपित्याच्या अट्टाहासामुळे आई-बाप कर्जबाजारी बनून मुलीला हुंडा देण्याचे कबूल करतात आणि ते फेडणे न झाले तर आर्थिक संकट येते. बोलणीप्रमाणे पैसे नाही दिले तर मुलीचा छळ सुरू होतो. शारीरिक आणि मानसिक. हुंडा आण मग तो कशासाठी ? कारणे वेगवेगळी दवाखाना बांधणे, घर बांधणे, गाडी घेणे, सोने घेणे अगदी एखादी साधी गोष्ट असू शकते. या सामान्य गोष्टीच्या मागणीतून छळवाद सुरू होतो. मुलीची स्थिती अडकित्त्यातील सुपारीसारखी होते. आई-वडिलांना दुःख, टोचणी, बोचणी, बोलणी सांगायची नाहीत आणि सासू, सासरे, दीर, नणंदेला विरोध करायची हिंमत नाही. त्यामुळे दोन्ही बाजू सहन न झाल्याने या जगाचा निरोप घेणे एकमेव मार्ग त्या स्त्रीसमोर उभा राहतो.

"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

हृदयी अमृत नयनी पाणी " 

अशा करुणतेने व्याकूळ झालेल्या स्त्रिया समाजात आजूबाजूला दिसतात. अशिक्षित लोकामधील भांडणे चव्हाट्यावर येतात परंतु सुशिक्षित लोकांकडून केला जाणारा छळ म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी असते.

  हुंडा न देण्यावरून कितीतरी लग्ने मोडतात, मुली प्रौढ बनतात. हा एक मोठा प्रश्न समाजाला भेडसावत आहे. मुलींच्या वा मुलांच्या संसाराची राखरांगोळी करण्यामध्ये त्यांच्या आई-वडिलांचाच हात असतो. सासूची अपेक्षा पूर्ण न करण्यामुळे ती आपल्या सुनेचा छळ करते. जेवढे मुलीचे शिक्षण जास्त तेवढ्या अधिक प्रमाणात शिकलेला नवरा हुडकणे ही एक प्रवृत्ती समाजात दिसते. शिक्षणामुळे वय वाढते, त्यामुळे हुंड्यामध्ये वाढ होते. हुंडा जास्त द्यावा लागेल म्हणून काही पालक आपल्या मुलींना जास्त शिकवत नाहीत. त्यामुळे मुलींचा पर्यायाने स्त्रियांचा सर्वांगीण विकास होत नाही. स्त्रिया अतिशय दुबळ्या दिसतात, स्त्रियांनी विरोध केला पाहिजे. अबला नव्हे सबला बनल्या पाहिजेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवली पाहिजे. मुलींनी जागरूक असलं पाहिजे. हुंडा देणे वा घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे याची माहिती पाहिजे. मुलींनी आपला आत्मविश्वास वाढविला पाहिजे. हुंडा बंदीवर भर दिला पाहिजे. आई-वडिलांनीपण आपल्या मुलाप्रमाणे वा आपल्या मुलीप्रमाणे आपली सून व जावई आहेत असे जर प्रत्येकानेच मनस्वी ठरविले तर हुंड्याचे हे भयानक स्वरूप नष्ट होईल. ही समस्या, ही कीड जर पूर्णपणे काढायची असेल तर प्रत्येकाचीच मानसिकता बदलायला पाहिजे. 

-समाप्त-

मित्रांनो "हुंडा एक अनिष्ठ प्रथा" या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 


Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन