Skip to main content

माझा आवडता ऋतु (शिशिर ऋतु) essay in marathi | मराठी निबंधलेखन

 माझा आवडता ऋतु (शिशिर ऋतु) मराठी निबंधमाझा आवडता ऋतु निबंध 

(शिशिर ऋतु)

    नुकतीच संक्रांत होऊन गेली. तिळगुळ देण्या-घेण्याने नवे स्नेहसंबंध जोडले गेले. तिळगुळ, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, तुप, लोणी यांचे महत्व मागील महिन्यात आपण पाहिले. या दिवसांत लहान मुलांना बोरन्हान घालण्याची प्रथा आपल्याकडे आहे. यात चुरमुऱ्याचे, गाजराचे तुकडे, उसाचे करवे, बोरे, हलवा, हरभ-्याचे घाटे हे सगळे मिसळुन त्यांनी त्या मुलाला न्हान घालतात.

    हे सगळे पदार्थ ह्या दिवसात निसर्ग देतो. निसर्गाच्या उपलब्धीकडे लक्ष वेधणारी आहे. त्या समृध्दीचा आस्वाद घडविणारी बालपणापासुन निसर्ग स्नेही जीवनशैलीचा संस्कार करणारी ही परंपरा किती हृदयस्पर्शी आहे. या ऋतूतील फळे म्हणजे मोरे, आवळे,पेय इ. ही फळे या दिवसांत खावी आवळा बुध्दिवर्धक दृष्टी सुधारणारा रसायन म्हणजे धातुंना बल देणारा, भुक वाढविणारे पचन सुधारणारा सारक अशा सर्व गुणाने संपन्न असतो. 

  गाजर बीट मुळा यासारख्या कंदवर्गीय भाज्या ही या दिवसांत विशेष सत्वयुक्त असतात. या ऋतुत मिळणारे हरभरे, वटाणे कोवळे असल्याने पचायला हलके असतात. आणि या ऋतुत पचनशक्ती चांगली असल्याने सहज पचु शकतात.

   हिरव्या पालेभाज्या या दिवसांत बऱ्याच मिळतात.पावसाळ्यामध्येही पालेभाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात, पण त्यावर किडींचे प्रमाणही बरेच असते. हिवाळ्यात पालेभाज्यांची वाढ चांगली होते पण थंडीच्या कडाक्यामुळे किडींची वाढ होत नाही. त्यामुळे पालेभाज्या निर्धोक व स्वच्छ असतात. 

शिशिर ऋतूत येणारा सण : रथसप्तमी

  माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमी असे संबोधले जाते. माघ पौर्णिमा म्हणजे नव्याची पुनव, नवान्न पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी शेतकरी शेतात नव्या धान्याचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करतात आणि मगच नवे धान्य खादावयास प्रारंभ करतात. या दिवशीसुद्धा संक्रांतीप्रमाणेच गुळाच्या पोळ्या, साजुक तुप आवर्जुन ग्रहण करतात. नव्या सात धान्यांच्या राशी सुपात घालून या दिवशी त्यांचे दान करतात. 

१. गहु २. तांदुळ ३, ज्वारी ४ चणा ५. तूर ६. उडीद ७. मूग अशी ही सात धान्य. 

-समाप्त-

मित्रांनो माझा आवडता ऋतु (शिशिर ऋतु) ह्या निबंधात जर तुम्हाला काही बदल करावासा वाटत असेल तर तुम्ही मला कॉम्मेंट करून नक्की सांगा. मी लवकरात लवकर बदल करण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद !

Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन