Skip to main content

माझा आवडता ऋतु (वसंत ऋतु) मराठी निबंध | Essay writing in Marathi

 माझा आवडता ऋतु (वसंत ऋतु) मराठी निबंधवसंत ऋतू निबंध

   महाशिवरात्री होऊन गेली की होळी, रंगपंचमी या सणाचे वेध लागतात. थंडी पार संपुन उन्हाळा जाणवतो. वसंत व ग्रीष्म हे उन्हाळ्याचे दोन ऋतु.

   या दिवसात दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका फारच असतो. त्यामुळे शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे. शक्यतो आपल्या कामाचे नियोजन असे करावे की कडक उन्हाच्या वेळी बाहेर फिरावे लागणार नाही, बाहेर फिरणे आवश्यक असले तर डोक्यावर छत्री,टोपी,रुमाल,पदर असे काहितरी आच्छादन असणे गरजेचे आहे.

   उन्हाळाच्या दिवसात घाम खुप येतो त्यामुळे तो टिपला जाईल असे सुती कपडे वापरणे चांगले असते. कृत्रिम धाग्यांच्या कपड्यांनी घाम टिपला जात नाही. आणि तो तसाच अंगावर राहिल्याने निरनिराळ्या त्वचेचे विकार, पुराच्च उष्णे, पामोळे येणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. सुती कापड सर्वच ऋतुत हितकर असते. उन्हामुळे घाम खुप येतो आणि शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर टाकले जाते. त्यामुळे तहान खुप लागते. पाणी प्यावेसे वाटते. बर्फ टाकुन थंड केलेले किंवा फ्रीजमपील पाणी पिऊ नये, असे पाणी शरीरातील उष्णता जास्त बाढवते. म्हणुन परत कोरडे पडुन पुन्हा पुन्हा तहान लागते. अशा वेळी माठातले वाळा टाकुन ठेवलेले पाणी प्यावे जे थंड तृष्णशामक व पित्तशामक असते.

   या दिवसांत रसाळ फळे जसे की द्राक्षे, कलिंगडे हि फळे जरी दिवाळीपासुन मिळत असली तरी त्याचा खरा हंगाम आता म्हणजे उन्हाळ्यात आहे. रसाळ फळाच्या सेवनाने लघवीवाटे विषद्रव्ये शरीराबाहेर टाकण्यास मदत होते, द्राक्षे मधुर, पौष्टिक, भुक वाढवितात. शक्यतो फवारणी न केलेली द्राक्षे खावीत, तशी नाही मिळाली तर खाण्यापुर्वी दीड ते दोन तास पाण्यात भिजत ठेऊन मग दोन तीण वेळा धुऊन मग खावीत. पचायला हलके पदार्थ खावेत. नेहमीच्या भाज्यांना फोडणी देतानाही मोहरी ऐवजी पंड असलेले पणे जिरे वापरावे. ज्वारी, नाचणी अशी पचायला हलकी धान्ये खावीत.

   वसंत ऋतु हा मराठी माघ फाल्गुन या महिन्यात येतो. म्हणजे १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या काळात असतो. रात्र लहान व दिवस मोठा होऊ लागतो. सुर्याची उष्णता वाढल्याने कफाचे विलयन होऊन कफ पातळ होतो. त्यामुळे खोकला, कफ, दमा इ. कफविकार सुरू होतात. कफप्रकोप व अग्रिमांदयामुळे आहार लघु असावा व मात्रा ही कमी असावी.

   झाडांना पाने व फुले बहरलेली दिसतात. पचन शक्ती कमी असते. अनेक कफाचे आजार होताना दिसतात. उष्मा वायु लागतो. निसर्ग बहरून येतो.

वसंत ऋतुत काय खावे : 

 1. आहार रस :  प्राधान्याने कड़, तिखट आणि तुरट रसाचे धान्य व पदार्थ सेवन करावे. 
 2. तृणधान्ये :  गहु ज्वारी, तांदुळ (अल्पप्रमाणात)
 3. कडधान्ये :  मुग, मसुर, कुळीथ, हरभरा, जव.
 4. फळभाज्या :  पडवळ, वांगी कारले, मेथी.
 5. फळे:  कवठ, दाम, कलिंगड, खरबुज.
 6. पेय : तुळस, सब्जा बी पाण्यात भिजवुन पिणे, लिंबु, कोकम अशा आंबट तुरट फळांची सरबते, गायीचे साजुक तुप.
 7.  मसाले :  हिंग, मोहरी, मिरी, दालचिनी, जिरे

 काय करावे (विहार) :  व्यायाम करावा, उटण्याने स्नान करावे, चंदन, केशर आदी सुंगधी द्रव्यांचा वापर करावा.

वसंत ऋतुत काय खाऊ नये : 

 1. खाऊ नये : तिखट, मसालेदार,  खरवस, श्रीखंड. मिठाई सारखे गोड व पचायला जड पदार्थ, साबुदाणा, शेंगदाणे, उडीद डाळ, पनीर, चीज, बाजरी इ. 
 2. काय करू नये (विहार) : दिवसा झोपणे, बर्फातले/ फ्रीज मधले पाणी पिणे 
 3. साधारण होणारे व्याधी :  श्वास, कास, प्रतिश्याय, श्वसनाचे आजार, अग्रिमादय.
 4.  विशेष काळजी :  होळी रंगपंधरमीला कृत्रिम रंग न वापरता पळस पांगायची फुले, बेसन, हळद असे नैसर्गिक घटक वापरावे. कडुलिंबाची पाने खावी त्याने पित्त व कफ कमी होते. जिभ साफ होऊन तोंडाची चव सुधारते. द्राक्षांवर रसायनाचा खुप फवारा करतात, केवळ सेंद्रिय शेतीत पिकवलेली फळे खावीत.
-समाप्त- 

Comments

Popular posts from this blog

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मला पंख असते तर..." Essay in marathi | मराठी निबंधलेखन

"मला पंख असते तर"  कल्पनात्मक मराठी निबंध " मला पंख असते तर.."  हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला  " मला पंख असते तर.."  हा  निबंध  कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे .   मला पंख असते तर..  मी पक्षी असतो तर....     उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी घरात बसवत नव्हते म्हणून आईजवळ हट्ट केला आणि आईला घेऊन एका बागेत जाण्याचा निर्णय घेतला.. मी प्रथम पशुपक्ष्यांच्या पिंजऱ्यातील वेगवेगळ्या रंगांचे पक्षी पाहण्यात गुंग झालो. त्यावेळी वाटले   “आकाशी झेप घे रे पाखरा   सोडी सोन्याचा पिंजरा"    या पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांचे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले, याचे खूप वाईट वाटले. मी त्या पिंजऱ्यातील पक्ष्यात स्वत:ला शोधू लागलो. तेव्हा मला वाटले मी पक्षी असतो, मला पंख असते तर.. मी असा पिंजऱ्यात अडकून राहिलोच नसतो. सर्व बंधने झुगारून उंच भरारी घेतली असती, मानवाने केलेला अन्याय झटकला असता आणि भुर्रकन उडून  गेलो असतो.     मला पंख असते तर 'सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्' अशा आशेतून हिमालय