Skip to main content

माझा आवडता सण (होळी, गुढीपाडवा आणि वटपूर्णिमा) essay in marathi | निबंधलेखन

 माझा आवडता सण (होळी, गुढीपाडवा आणि वटपूर्णिमा)                                                         माझा आवडता सण होळी
  वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे होळी थंडी संपुन उष्णता वातावरणात दाढण्याची सुरूवात या दिवसापासून होते. शरीरामधेही उष्णता, थंडाई पिण्याची प्रथा आहे. थंडाईमधे वापरली जाणारी दूध, गुलाबकळी, खसखस, काकडी, बदाम ही द्रव्ये थंड गुणाची व उष्णता कमी करणारी आहेत. तसेच होळीची पूजा करताना होळीमध्ये पुरणपोळी, पैसे, पानसुपारी,खोबरे, कापूर, नारळ, पानगळ मध्ये झडलेला पालापाचोळा, शेणाच्या गोवऱ्या मधे पेटविले जाते. यामध्ये निर्माण होणाऱ्या धूराचा परिणाम वातावरणातील वाढलेल्या कृमिवर होतो. जसे पौराणिक कथेनुसार लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, ढुंढा, पूतना ह्यासारख्या राक्षसांच्या दहणाची कथा आहे. 

    आयुर्वेदानुसार यांनाच ग्रहबाधा म्हटले आहे. ग्रहबाधा म्हणजे (सध्याचे Virus & Bacteria) यांचे दहण होते. कृषी संस्कृतीतील या सणाचे विशेष महत्व आहे. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्याची प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओव्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पिक तयार होते हे त्यामागील कारण. नवीन पीक अग्नि देवतेला समर्पित करण्याची प्रथा आहे. तसेच जसे होळीमध्ये सगळा पालापाचोळा होळीत जळाल्यामुळे परिसर स्वच्छ होतो. तसेच मोठ्याने ओरडून मनातील सगळी दुष्यवृत्ती बाहेर काढण्यासाठी मोठ्याने आचि बोलणे व बोंब मारण्याची परवानगी असते. अशा प्रकारे पर्यावरण व मन असे दोन्ही स्वच्छ करणारा आरोग्यदायी असा हा सण आहे.माझा आवडता सण गुढीपाडवा

   हिंदु वर्षाची सुरूवातच गुढीपाडव्यापासूनच होते. गुढीपाडवा ही तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. याच दिवसापासून पृथ्वीवरच्या तापमानात वाढ होत असते. तापमानात वाढ म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. बल कमी होते. घामामुळे अंगावट पुरळ उठतात. आपल्यात गुढी उभारण्याच्या पद्धतीत कलशासोबत आपण साखरेच्या गाठी आणि कडूनिंबाची पाने जरीच्या वस्त्राला बांधतो.

साखरेच्या गाठी मधुर गोड रसात्मक, रूचिकर गुणाने थंड असतात. ऊन जास्त लागून आलेला थकवा गाठीच्या पाण्याने दूर होतो. शरीरात थंडावा येतो. कडुनिंबाची पाने कडू, रसात्मक असून गुणाने थंड, लघू व मलाचे स्तंभन करणारी आहेत. तसेच पित्त व कफ कमी करणारी आहेत. अंगावर उठलेले पूरळही याने कमी होतात.

गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूचा वापर करून बनवलेल्या टोपल्या व परड्या भाज्या व फुले सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. गुढीला घालण्यात येणारे रेशमी वस्त्र हे रेशमाच्या किड्यापासून निघालेल्या धाग्याने बनविलेले असते. रेशमाचे कीडे ज्या झाडावर पोसले जातात ते झाड म्हणजे तुतीचे झाड. तुतीची फळे ही गुणाने थंड, आंबट, गोड असल्याने वात व पित्ताचे शमन करतात.
   माझा आवडता सण वटपौर्णिमा

ज्येष्ठी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ही पौर्णिमासुद्धा वातावरण बदलत असतांना आरोग्य कसे राखावे ह्यासाठी महत्वाची ठरते. हवेतील ऑक्सिजनची कमी होत असताना घरातील स्त्रियांना ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज असते. वडाच्या सानिध्यात ह्या दिवसांत जर वेळ व्यतित केला तर शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. स्त्रीने तिच्या आरोग्याची जर काळजी घेतली तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहण्यास मदत होते. वडाचे झाड, त्याच्या पारंब्या, पाने, फुले ह्याचा स्त्रियांच्या उदर आरोग्याशी घनिष्ठ संबध आहे. म्हणून वटपौर्णिमेचे व्रत करण्यास सांगितले आहे.

    वडाच्या झाडाला पारंब्या फुटून त्या जमिनीत शिरून मुळ्यांचे काम करतात आणि वटवृक्ष अक्षय्य राहतो. (म्हणून वटपौर्णिमेला हे व्रत केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असे सांगितल्यास भारतीय स्त्रिया हे व्रत नेमाने करतील अशी आपल्या आयुर्वेदाचार्याची हमी होती. धर्माच्या आडून आरोग्य राखण्याचा हा प्रयत्न) वडाचे पंचांग चिकित्सेत वापरले जाते. गुणाने थंड, स्तंभन करणारे, मूत्राचे संग्रहण करणारे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करावी पण वृक्ष तोड करून फांदीची पूजा करू नये. वटपौर्णिमेला वडाची पूजा ही वटवृक्षारोपण करून केली तर ते उत्तम व आरोग्यदायी ठरेल.

Comments

Popular posts from this blog

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मला पंख असते तर..." Essay in marathi | मराठी निबंधलेखन

"मला पंख असते तर"  कल्पनात्मक मराठी निबंध " मला पंख असते तर.."  हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला  " मला पंख असते तर.."  हा  निबंध  कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे .   मला पंख असते तर..  मी पक्षी असतो तर....     उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी घरात बसवत नव्हते म्हणून आईजवळ हट्ट केला आणि आईला घेऊन एका बागेत जाण्याचा निर्णय घेतला.. मी प्रथम पशुपक्ष्यांच्या पिंजऱ्यातील वेगवेगळ्या रंगांचे पक्षी पाहण्यात गुंग झालो. त्यावेळी वाटले   “आकाशी झेप घे रे पाखरा   सोडी सोन्याचा पिंजरा"    या पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांचे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले, याचे खूप वाईट वाटले. मी त्या पिंजऱ्यातील पक्ष्यात स्वत:ला शोधू लागलो. तेव्हा मला वाटले मी पक्षी असतो, मला पंख असते तर.. मी असा पिंजऱ्यात अडकून राहिलोच नसतो. सर्व बंधने झुगारून उंच भरारी घेतली असती, मानवाने केलेला अन्याय झटकला असता आणि भुर्रकन उडून  गेलो असतो.     मला पंख असते तर 'सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्' अशा आशेतून हिमालय