Skip to main content

मन करा रे प्रसन्न मराठी निबंध | निबंधलेखन

मन करा रे प्रसन्न मराठी निबंधलेखन ( " मन करा रे प्रसन्न..." हा एक वर्णनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला " मन करा रे प्रसन्न.." हा निबंध वर्णनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.)

मन करा रे प्रसन्न निबंध 


  मन करा रे प्रसन्न | सर्व सिध्दीचे कारण || या संत तुकाराम महाराजांच्या विचाराची, अभंगाची आज जगालाच गरज आहे. मानवी जीवन आनंदी करणे, प्रसन्न करणे आज किती गरजेचे आहे याचा थोडासा विचार करू. 

  आजच्या २१ व्या शतकातील मानवी जीवन अतिशय धकाधकीचे झाले आहे. घड्याळाच्या तालावर आपले जीवन त्याला कंठावे लागते. तरी पण त्याचे ' मन' त्याला जपता येत नाही. आनंदापेक्षा दुःखच त्याच्या वाटेला येते, यावर मात करून इच्छित, अपेक्षापूर्तीसाठी आनंदाच्या राजमार्गाचा शोध घेतला पाहिजे. आनंद आणि दु: ख मानवाच्या मानसिकतेच्या दोन बाजू आहेत. मन आणि मानसिकता या समुद्राच्या लाटाप्रमाणे असतात. त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला की, त्या अधिक फेसाळतात. मनाला काबूत ठेवणे, ताब्यात ठेवणे तसे खूप कठीण असते. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे

मन वढाय वढाय
  उभ्या पिकातलं ढोर ।
किती हाकलं हाकलं
 फिरी येतं पिकावरं।

अशा मनाला आवरणं हे खुप कठिण असते. समर्थ रामदासांनी म्हणूनच 'मनाचे श्लोक ' लिहून मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक श्लोक अतिशय मार्मिक आणि मार्गदर्शक आहे. मानवी मनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून मानवाला सदविचार, सत्प्रवृत्ती, सुसंस्काराची शिदोरी दिली.

 खरे पाहता मन हे कांही शरीरावयव नसूनसुद्धा मानव त्याच्या आधीन आहे. एवढेच नव्हे तर एक होकार देणारे आणि एक नकार देणारे अशी दोन मने आहेत. कोणतेही कार्य करू की नको अशी संभ्रमावस्था मनामुळेच निर्माण होते, माणसाची मानसिकता बदलते. महाभारतातील अर्जुनसुद्धा कुरुक्षेत्रावर प्रचंड मानसिक तणावाखाली असताना श्रीकृष्णाच्या गीतामृताने तृप्त होउन आपले इच्छित कार्य पूर्ण करतो. प्रभू रामचंद्राची मानसिकता किती विषण्ण होती ते रामायणावरून दिसते. अशा महान देवांची ही गाथा मग माणसांची काय कथा?

 आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मानवाची मानसिक अस्वस्थता वाढताना दिसते. उठल्यापासून झोपेपर्यंतच्या प्रवासात बऱ्याच गोष्टी मनात नसताना कराव्या लागतात. त्यामुळे मनाची प्रसन्नता, आनंद, उल्हास कोमेजून गेलेला दिसतो. त्यासाठी मंत्रराज ॐ काराचा जप करावा. त्यामुळे निद्रानाश, मनोविकार, हृदयविकार, मधुमेह, वायुदोष यावर नियंत्रण ठेवता येते, चेतासंस्था कार्यशील बनते. स्मरणशक्ती वाढते. हीच स्वास्थ्यप्राप्तीची गुरुकिल्ली आहे.

इंद्रायाणां मनो नाथो मनोनाथस्तु मारुतः
मारुतत्य लयो नाथः स लयो नादमाश्रितः ।।

 नाद साधनेतून आनंदाच्या लहरी निर्माण होतात, मनोविकार दूर पळतात. एखादे आवडीचे गीत, संगीत ऐकल्यावर मनाची मरगळ दूर होते. आपण आपल्याला असलेला एखादा छंद जोपासल्यावर मनातील ताणतणाव दूर होतात. शरीर आणि मन यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. शारीरिक क्रियांचा सुयोग्य रितीने वापर करून मनाची ताकत वाढविण्यासाठी योगासने, प्राणायाम करावीत. त्यामुळे विविध आजार तर दूर होतात त्याचबरोबर शरीर व मन सुदृढ बनते. मानसिक शक्तीचा विकास करण्यासाठी सूर्याची उपासना करावी. सूर्याचे तेज मनास लाभते. गायत्री मंत्राचा जप करावा, सूर्यनमस्कार घालावेत.

सकल दोषांचा परिहार करिता।
सूर्यनमस्कार स्फुर्ति वाढे निरंतर || सूर्यदर्शन होता ||

असे समर्थांनी ' दासबोधात' सांगितले आहे. त्यामुळे आळस, चिंता दूर होऊन उत्साह, नवचैतन्य तसेच आत्मविश्वासही निर्माण होतो. चित्तशुध्दी होते, मनोविकार दूर होऊन सात्विक भाव जागृत होतात.

 वाचन, लेखन, चिंतन यांच्याशी मैत्री करावी. पुस्तकासारखा जवळचा दुसरा मित्र नसतो. वाचनाने मन समृध्द होते, विचार प्रगल्भ होतात. वाचाल तर वाचाल हे वचन लक्षात ठेवावे. पुस्तकाशिवाय इतर मित्रमैत्रीणींशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात, खळखळून हसत राहावे. जर मन प्रसन्न असेल तर पुढचं आयुष्य प्रसन्न असेल. 

-समाप्त-

मित्रांनो " मन करा रे प्रसन्न..." या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Also read : 

Comments

Popular posts from this blog

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मला पंख असते तर..." Essay in marathi | मराठी निबंधलेखन

"मला पंख असते तर"  कल्पनात्मक मराठी निबंध " मला पंख असते तर.."  हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला  " मला पंख असते तर.."  हा  निबंध  कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे .   मला पंख असते तर..  मी पक्षी असतो तर....     उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी घरात बसवत नव्हते म्हणून आईजवळ हट्ट केला आणि आईला घेऊन एका बागेत जाण्याचा निर्णय घेतला.. मी प्रथम पशुपक्ष्यांच्या पिंजऱ्यातील वेगवेगळ्या रंगांचे पक्षी पाहण्यात गुंग झालो. त्यावेळी वाटले   “आकाशी झेप घे रे पाखरा   सोडी सोन्याचा पिंजरा"    या पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांचे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले, याचे खूप वाईट वाटले. मी त्या पिंजऱ्यातील पक्ष्यात स्वत:ला शोधू लागलो. तेव्हा मला वाटले मी पक्षी असतो, मला पंख असते तर.. मी असा पिंजऱ्यात अडकून राहिलोच नसतो. सर्व बंधने झुगारून उंच भरारी घेतली असती, मानवाने केलेला अन्याय झटकला असता आणि भुर्रकन उडून  गेलो असतो.     मला पंख असते तर 'सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्' अशा आशेतून हिमालय