मी पाहिलेली जत्रा वर्णनात्मक मराठी निबंध
मी पाहिलेली जत्रा निबंध
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापासून जवळच्याच अंतरावर माझ्या आजी चे गांव आहे. तस गांव बरंच प्रगत आहे. मी बर्याच वेळा मामा-मामी, आजी-आजोबांना भेटायला जवळ्याला जाते आणि जत्रेला तर दरवर्षी जातेच. जवळ्याच जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली ही जत्रा जरी मुस्लिम बांधवाचा खास पर्व असला तरी संपूर्ण गावातून तसेच अजुबाजुच्या खेडयामधुन सर्व जातिधर्माचे भाविक या जत्रेला हजेरी लावतात.
जत्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे अतिशय अप्रतिम कव्वाली चे सादरीकरण. मला ते खूप आवडते. गाणारा जेवढ़या श्रद्धेने गातो, ऐकनारा तेवढाच भावूक होतो. जत्रेसाठी जाताना आज्जी व मामी देवासाठी माखमालीचे चादर, अगरबत्ती, फुले असे पूजेचे साहित्य घेतात. सैलानी देवाला चादर अर्पण केल्याने सर्व कष्ट, दुःख कमी होतात अशी आमच्या आज्जींची श्रद्धा आहे आणि घरातील कोणीही तिच्या श्रद्धेला, भावनेला दुखवत नाही. आम्ही मुले तर जत्रेत खूप खूप मज्जा करतो. आईस्क्रीम, कुल्फी, पाणी पुरी, मिठाई, चटकदार भेळ, गोड लाल/हिरव्या मिरच्या, रेवडी, विविध प्रकारचे सरबत, खूप खूप खाण्याचे पदार्थ असतात.
तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेत आकाशपाळणा, मेरिगो राऊंड, घासारगुंड्या, घोडागाडी, विविध प्रकारचे झुलही असतात. तेही स्वस्त दरात. आम्ही तर सर्व झुल्यांची स्वारी करतो. मला आकाशपाळणा खूप आवडतो. जत्रेत महिला व लहान मोठया मुली नटूनथटून येतात. सगळे नवीन कपडे घालतात. विविध प्रकारची रोशनाई व पताका, फुलांची सजावट यामुळे परिसर अतिशय शोभानीय दिसतो. तर अगरबत्त्या, धूप यांच्या सुगंधाने परिसर भक्तिमय होऊन जातो. तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेसाठी मी वर्षभर वाट बघते आणि हे तीन दिवस मात्र पटकन निघून जातात. या तीन दिवसात आम्ही वर्षभर आठवता येतील एवढी मज्जा करून घेतो.
-समाप्त-
मित्रांनो आमच्या गावची जत्रा किंवा मी पाहिलेली जत्रा या विषयावरील निबंध कसा वाटला ? याबद्दल तुमचं मत मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. जर यात काही बदल करायचा असेल तर तेही तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
धन्यवाद !!
Comments
Post a comment