Skip to main content

"मुलगी शिकली प्रगती झाली" essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

मुलगी शिकली प्रगती झाली मराठी निबंधशाळेच्या अभ्यासासाठी किंवा परीक्षेत विचारला जाणारा सर्वात आवडता निबंध म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली. मुलींच्या शिक्षणावर जितके लिहू तितके कमी आहे. खाली दिलेल्या मुलगी शिकली प्रगती झाली या निबंधात सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर विस्तारपणे लिहिले आहे. ह्या निबंधातून माणसाचे मुलींकडे बघण्याचा व त्यांना शिक्षण देण्याचा दृष्टिकोन सरळ होईल.


मुलगी शिकली प्रगती झाली निबंध 

 " कळी उमलणार नाही जीवनरसावाचून

मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून "

या दोनच ओळी किती मार्मिक आहेत, किती बोलक्या आहेत. या दोन ओळीतून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सामावलेले आहे. एखादी कोवळी कळी उमलण्यासाठी आणि संपूर्ण फूल होऊन फुलण्यासाठी वेगवेगळ्या साधनांची, घटकांची आवश्यकता असते तसच मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची गरज असते. शिक्षणामुळे मुलींच्या व्यक्तिगत विकासाबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक पर्यायाने राष्ट्रीय विकास होतो.

   नेपोलियनने म्हटले होते की, मुलांच्या शिक्षणापेक्षा मुलींच्या शिक्षणाला मी प्राधान्य देईन कारण एक मुलगी शिकली तर तिच्याद्वारा एक कुटुंब सुशिक्षित होते. कमी वेळात व कमी खर्चात राष्ट्र शिक्षित करण्याचा हा खात्रीलायक उपाय आहे. खरोखरच हे विचार खूप मार्गदर्शक आहेत. मुलगी ही दोन्ही घरात आपल्या प्रेमाने, कर्तृत्वाने प्रकाशमान होऊन घराण्याचा लौकिक वाढवत असते. म्हणूनच ती जर सुशिक्षित, सुसंस्कारित, सुविद्य, सज्ञान, सद्गुणी, सतशील असेल तर त्या घराची प्रगती वैभवाच्या शिखरावर दिसेल.

  मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले त्याचे शब्दात वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. मुलींच्या शिक्षणासाठी फुले यांनी सन १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्त्रीशिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची नेमणूक केली. त्यांना लोकांनी त्रास दिला तरी त्याला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले ज्ञानदानाचे कार्य सुरूच ठेवले. वेगवेगळ्या ठिकाणी शाळांची संख्या वाढली. हळूहळू मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढले आणि आज प्रत्येक गावात मुली शाळेत जातात.

  महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी १२ वी पर्यंत मोफत शिक्षणाची सोय केलेली आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी समाजाचाही सहभाग वाढविला. “मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण " या नावाने जाणीव जागृती सप्ताह गावोगाव साजरा केला. शिक्षण घेणं हा मुलींचाही हक्क आहे. मुलगा - मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाबरोबर पालकांचीही आहे. मुलींचे शाळेत न येण्याचे प्रमाणच गळतीचे प्रमाण सुद्धा चिंतनीय आहे. बऱ्याच मुलींना गरिबी, दारिद्रय, घरकाम, पालकांची परवानगी, अज्ञान, विवाह यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. शैक्षणिक, वैचारिक, बौध्दिक प्रगती तर खुंटतेच परंतु आर्थिकही प्रगती होत नाही त्यामुळे तिची कोणतीही प्रगती होत नाही. तिला तिचे विचार मांडण्यासाठी, तिच्या वाणीला, बुद्धिला, मनाला कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळण्यासाठी तिच्यातील उपजत गुणांच्या विकासासाठी शिक्षणाची गरज असते. ती या सर्व गुणांनी परिपूर्ण असेल तर पुढे तिचे कुटुंबसुध्दा परिपूर्ण व आदर्श कुटुंब ठरेल.

  आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे. रिक्षा चालवण्यापासून ते अंतराळापर्यंतची तिची झेप असो किंवा कुटुंबाची व्यवस्था पाहणाऱ्या गृहिणींपासून ते देशाचा राज्यकारभार करण्याइतपत ती सक्षम झालेली आहे, जागृत झालेली आहे. तरी सुद्धा अन्यायाला झगडणाऱ्या महिलांची, मुलींची संख्या काही कमी नाही. या सर्व मुलींनी, महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. अबला न राहता सबला झाली पाहिजे. तिच्यात आत्मविश्वास वाढला पाहिजे याचसाठी तर शिक्षणाची शिदोरी मुलींच्या जवळ असली पाहिजे. स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शिकलेली मुलगी आपल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडू शकते हे वास्तव नाकारता येत नाही.

  जी मुलगी शिक्षित असते ती आरोग्याच्या बाबतीतही खूप जागरूक असते. शिक्षण हे स्त्रियांना आर्थिक आणि मानसिक सामर्थ्य देते. शिक्षणामुळे स्त्रीची निर्णयक्षमता वाढते. तिला घरात, गावात, राज्यात, देशात, जगात समर्थ नागरिक म्हणून उभे करते. म्हणूनच ज्या घरातील ज्या देशातील स्त्री शिक्षित ते घर, तो देश प्रगत म्हणून ओळखला जातो. कमी शिकलेल्या आईपेक्षा जास्त शिकलेल्या आईला आपल्या मुलीच्या शिक्षणात अधिक रूची असते आणि ती आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करते म्हणूनच आर्थिक स्थैर्याबरोबर मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य घरातील स्त्रियांवरच अवलंबून असते. सुशिक्षित मुलींमध्ये विनय, सौजन्य, सहनशिलता, श्रमप्रतिष्ठा वगैरे मुल्ये विकसित झालेली असतात त्यामुळे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची गरज आहे.

 'ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे'  'नही ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते' 'विद्याधनम् सर्व धनम् प्रधानम्' विद्येचं, ज्ञानाचं, शिक्षणाचं महत्त्व अशाप्रकारे अनन्यसाधारण आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. प्रत्येक घरातली मुलगी म्हणजे प्रत्येक ज्योत, ती ते घर प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही. ज्या घरातील मुलगी, स्त्री शिकलेली नसते तेथे अज्ञानाचा अंधकार असतो.

- समाप्त -

मित्रांनो जर तुम्हला हा निबंध आवडला असेल, ह्या निबंधातून तुम्हला जर वाटत असेल की खरच मुलगी शिकली पाहिजे, मुलीने मुलांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे तर तुमचं मत मला खाली कंमेंट करून नक्की सांगा. 

धन्यवाद !!!

Also read : 

1) अंधश्रद्धा एक शाप निबंध

2) वाचन एक छंद

3) व्यवसाय शिक्षण काळाची गरज

4) पाणी आडवा पाणी जिरवा

5) हुंडा : एक अनिष्ठ प्रथा


Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व