Skip to main content

पाणी अडवा- पाणी जिरवा essay in Marathi | निबंधलेखन | मराठी निबंध

 "पाणी अडवा- पाणी जिरवा" वैचारिक मराठी निबंध " पाणी अडवा- पाणी जिरवा..." हा एक वैचारिक निबंध आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व सांगायचे असते, त्या गोष्टींची गरज पटवून द्यायची असते. खाली दिलेला " पाणी अडवा- पाणी जिरवा..." हा निबंध वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.

पाणी अडवा- पाणी जिरवा निबंध 

    मुंबईला आलेला महापूर आणि दक्षिण भारतातील दुष्काळ या अलीकडील दोन्ही घटनांचा विचार करता अशी परिस्थिती का निर्माण झाली असावी? असा एक प्रश्न पडतो. परवा सुट्टीत एका खेडेगावी गेलो असता, एक शेतकरी उदास होऊन बसला होता. त्याला विचारलं की, कोणती समस्या आहे? त्याचं उत्तर ऐकून नवल तर वाटलं! परंतु शंकांचं काहूर माजलं. त्या शेतकऱ्याने उत्तर दिलं, आमच्या २० एकर शेतात १३ बोअर मारले परंतु एकाही बोअरला पाणी लागलं नाही.' भरपूर पैसा वाया गेला आणि पाणीपण नाही. आज शेतीसाठी पाणी नाही कालांतराने वापरण्यासाठी, पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळणार नाही. 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे प्रत्येक पाण्याचा थेंब महत्त्वाचा आहे. म्हणजे जीवन आहे'. 

   पाणी हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक साधन आहे. नद्या, सरोवरे, तळी, कालवे, विहिरी, उपसासिंचन याद्वारे आपल्याला पाणी मिळते, परंतु या पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे वृष्टी किंवा पाऊस होय. आजकाल पावसाची नक्षत्रे  कोरडी जात आहेत. पावसावर आधारित असलेली जिरायती शेती ओस पडत आहे. भूजलाची पातळी खाली गेल्यामुळे पाणी उपलब्ध नाही आणि पावसाचे प्रमाण सुद्धा कमी-जास्त झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पर्यायाने मानव संकटाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. समुद्राचे पाणी ७१ टक्के आहे परंतु त्या पाण्यापासून उपलब्ध गोडे पाणी केवळ एकच टक्का आहे. त्यामुळे या पाण्याच्या वापराचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.  

    पाणी ही अमूल्य अशी देणगी आहे. आपला भारत देश सुजलाम् सुफलाम करण्यासाठी सरकारने 'पाणी अडवा पाणी जिरवा' ही योजना आखली. मुंबईला पडलेल्या पावसाचा तसा काही उपयोग होत नाही. कारण ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. भूजलात वाढ होण्यासाठी पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याची आवश्यकता असते. त्यासाठी वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. उदा. जायकवाडी प्रकल्प, दामोदर खोरे प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, भाक्रानांगल प्रकल्प या मोठमोठ्या प्रकल्पाबरोबरच लहान प्रकल्पाचेही नियोजन शासनाने केले आहे. पाणलोट क्षेत्र विकास, शेततळी बांधणे इ. परंतु पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, पाणी वाया जाऊ देता कामा नये यासाठी पण प्रत्येक नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या घरावरच्या छतावर पडलेला पावसाचा थेंब जलपुनर्भरणाच्या रूपातून जमिनीत मुरला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. शेतीत  सिंचनाचा वापर केला पाहिजे. पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी झाडे लावली पाहिजेत. किमान आपल्या घरात आपण जे पाणी वापरतो ते वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पाणी आपल्याला तयार करता येत नाही. आपल्याला निसर्गावरच अवलंबून राहावे लागते त्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला पाहिजे. नगरातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या नळातून वाया जाणारे पाणी पाहिले की दूरदर्शनवरील ती जाहिरात आठवते. पाण्याचा एक एक टपकणारा थेंब, वाया जाणारे पाणी पाहून अस्वस्थ झालेला तो अपंग, आजारी नागरिक खूप मोठा मोलाचा संदेश देऊन जातो. याची जाणीव प्रत्येकानेच ठेवली पाहिजे. 

 घरातील नळाच्या तोट्यांची दुरुस्ती असेल किंवा नगराच्या पाईपमधून वाया जाणाऱ्या पाण्याच्या पाईपची दुरुस्ती असो प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याकडे लक्ष देऊन पाणी वाचविले पाहिजे.  

रानोमाळ भटकणाऱ्या, पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या माणसाबरोबर प्राण्यांनाही पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही, मृगजळाप्रमाणे धावावे लागणार नाही, र तकाप्रमाणे वाट पाहावी लागणार नाही, या सर्व गोष्टींचा आनंद लुटायचा असेल तर 'पाणी अडवा पाणी वाचवा' हा उपक्रम प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे.

-समाप्त-

मित्रांनो " पाणी अडवा- पाणी जिरवा.." या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Also read : 

  


Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन