Skip to main content

"संतांची शिकवण" essay in marathi | मराठी निबंधलेखन |

 संतांची शिकवण  मराठी निबंध



संतांची शिकवण हा एक अत्यंत महत्त्वाचा निबंध आहे. खूप वेळा मुख्य परीक्षेतसुद्धा ह्यावर निबंध विचारला गेला आहे. खाली संतांची शिकवण या विषयावर विस्तारितपणे निबंध दिला आहे. नेमके मुद्दे व संतांनी आपल्याला काय शिकवण दिली आहे  हे सांगण्याचा पुर्णपणे प्रयत्न केला आहे.


 संतांची शिकवण मराठी निबंध

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले.

“संत महात्मे होऊन गेले

चरित्र त्यांचे पहा जरा

आपण त्यांचे विचार ऐकावे

हाच सापडे बोध खरा"

  संत म्हणजे केवळ देवाचे भजन करणारा एक भक्त असतो असे नाही तर सत् असे कार्य, चांगले कार्य करणारा. हे कार्य सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक असे असते. संतांच्या साहित्याची देणगी मराठी रसिकाला, साहित्यिकाला, वाचकाला, भक्ताला मिळालेली आहे. साहित्याच्या सानिध्यात सामान्य माणूस जर विचाराने वावरायला लागला तर निश्चित त्याच्या वैचारिक क्षमतेत परिसाचा स्पर्श झाल्याचे आढळेल. संत साहित्य हे माणसात सांस्कृतिक श्रीमंती आणते. जीवनाला उजाळा देणारी सुंदरता, समृद्धी देणारी, उत्तमोत्तम विचार देऊन मन सुयोग्य मार्गावर नेणारी संतांची शिकवण असते.

'मना घडवी संस्कार, मना चेतवी संस्कार'

  असे संस्कार करण्याचे प्रचंड सामर्थ्य संस्कारात असते. हे संस्कार आपल्या तत्त्वज्ञानातून माणसावर करणारे संत श्रेष्ठ, तत्त्वज्ञानी हे मराठी संस्कृतीचे प्रचंड सामर्थ्य आहे. त्यांच्या संस्काराने मनात मानवता, ईश्वरता, अध्यात्मिकता, पावित्र्य, सौंदर्य, मांगल्य, प्रेम, आपुलकी, भूतदया वगैरे मूल्यांची जाणीव निर्माण होते.

  महाराष्ट्रातील संतांनी समाज कार्यातून समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन घडवून आणले आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति असे म्हणतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून "जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात" अशी प्रार्थना केली कारण त्यांनी आनंद भरीन तिन्ही लोक अशी प्रतिज्ञा केली होती. या दुःखाने, स्वार्थाने भरलेल्या जगात स्वतःचे दुःख न उगाळत बसता इतरांना सुख देण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. त्यांचा तो दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीत भक्त काळा आहे की गोरा आहे, उच्च आहे की नीच आहे, श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे याचा विचार न करता देव फक्त भावाचा भुकेला आहे असे सांगितले. कुळ, जाति, वर्ण हे आधवेचि गा अकारण असे ज्ञानदेवांनी सांगून समाजातील जातीयता दूर करण्याचा प्रयत्न केला. संस्कृत भाषेचा पगडा झुगारून ठेवून मराठीचा स्वीकार केला.

"माझा मराठाचि बोलु कवतिके

परि अमृतातेही पैजा जिंके

ऐसी अक्षरे रसिके मेळवीन"

  असे मराठीचे श्रेष्ठत्व वर्णिले आहे. भाषा व त्यातून होणारा भेदभाव दूर केला. त्या काळात अज्ञान, अंधश्रध्दा यांचे राज्य होते ते दूर केले.

"नाचू किर्तनाचे रंगी

ज्ञान दीप लावू जगी

सर्व सांडोनि माझाई

वाचे विठ्ठल रखुमाई"

  अशी ज्ञानाची शिकवण देऊन समाजात ज्ञानप्रसार करण्यासाठी नामदेवांनी  महात्म्य जनतेला सांगितला. हरिहर भेद नको देव भावाचा भूकेला आहे. त्यासाठी मीपणा, स्वार्थ, सोडून परमेश्वरासमोर आपण सर्वजण सारखे आहोत असा एकतेचा संदेश दिला.

  तुकारामांची अभंगवाणी तर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी आहे. जगताचे कल्याण हे संत जीवनाचे एकमेव उद्दिष्ट असते. लोककल्याणासाठी अविश्रांत कष्ट करण्याची संतांची प्रकृती असते. पाऊस पाडणं जस मेघाचं कार्य, प्रकाश देणं जसा सूर्याचा स्वभाव त्याप्रमाणे जगाच्या सुखासाठी प्रयत्नशील राहणं हा संतांचा धर्म असतो. संत माणसांच कल्याणासाठीच पृथ्वीतलवार येत असतात.

-समाप्त-

मित्रांनो संतांची शिकवण या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 


Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व