Skip to main content

श्रमाचे महत्त्व essay writting in marathi | मराठी निबंध |

 

श्रमाचे महत्व संपूर्ण मराठी निबंध खाली दिलेला आहे. हा निबंध शालेय अभ्यासासाठी किंवा मुख्य परीक्षेत विचारला जाऊ शकतो. श्रमाचे महत्व या निबंधात सगळ्या गोष्टींचा समावेश केला आहे. खालील निबंधात काही काव्य पंक्तींचासुद्धा वापर करण्यात आला आहे.


  श्रमाचे महत्त्व मराठीत निबंध

   कवि ग.दि. माडगूळकरांनी म्हटले आहे कष्ट करणाऱ्यांमध्ये परमेश्वर असतो. जो उद्योग, व्यवसाय, मेहनत, कष्ट करतो त्यास परमेश्वर साह्य करत असतो. प्रत्येक देशाचा, व्यक्तीचा , समाजाचा विकास हा कष्ठाशिवाय, प्रयत्नाशिवाय होऊ शकत नाही. श्रमाशिवाय पर्याय नाही. अगदी नवजात अर्भकापासून ते वयोवृध्दापर्यंत प्रत्येकाला कोणते ना कोणते कष्ट करावेच लागतात. शारीरिक, बौद्धिक श्रम दोन्ही महत्त्वाचेच आहेत. कोणतेही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते, निकृष्ट नसते तर काम करणारे कमी प्रतीचे किंवा श्रेष्ठ असे समजू नये. कारण,

श्रमो दाता, श्रमो नेता

श्रमो माता पिता श्रमः।

कर्ता कारयिता लोके

ह्येको देवः परिश्रमः ।।

   श्रम हाच दाता, नेता, माता, पिता, आणि कर्ता आहे. कोणतेही काम करण्यास लाजू नये. सर्व कामे समान आहेत. कोणतेही काम उत्स्फूर्तपणे करणे व कष्ट करणाऱ्यांबद्दल आदर दाखविणे म्हणजेच श्रमप्रतिष्ठा. आपल्या घरी काम करणारी मोलकरीण असो, दुकानात कारखान्यात काम करणारा कामगार असो किंवा शेतात राबणारा शेतमजूर असो ते राबतात, कष्ट करतात म्हणून तर आपल्याला सुखसोयी मिळतात परंतु त्यांच्या कामाला प्रतिष्ठा नाही आणि त्यांना समाजात आदराचे स्थान नाही म्हणून कवि नारायण सुर्वे म्हणतात,

" रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे,

कामगार आहे मी तळपती तलवार आहे. "

कामगाराला कवीने ब्रह्माची म्हणजे ब्रह्मदेवाची उपमा दिलेली आहे. या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा हा ब्रह्मदेव सर्व सुखापासून वंचित आहे, अशी खंत या कवितेत व्यक्त झालेली आहे.

  भारतीय लोक अज्ञानी आणी आळशी असल्यामुळेच परकीयांनी भारतीयांचे शोषण केले. भारताकडे सध्या लोकशक्ती आहे परंतु श्रमशक्ती कमी पडत आहे. चीन, जपान, अमेरिकेसारख्या देशांत कष्ट करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे. दे रे हरी पलंगावरी अशी वृत्ती येथील लोकांमध्ये दिसते त्यामुळे गरिबी, दारिद्रय, जातच नाही. लक्ष्मीची अपेक्षा असेल तर कष्ट करण्याची तयारी असावी. भारतातील काही नेते, उद्योजक कष्ट करूनच मोठे झाले. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम असतील, यशवंतराव चव्हाण असतील किंवा धीरुभाई अंबानी असतील, कष्टाच्या जोरावर राष्ट्राचा नेता, राज्याचा नेता, उद्योजक या पदव्या सार्थ करून दाखविल्या.

  ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची तमा न बाळगता कष्ट करणारा शेतकरी, सीमेवरील सैनिक, रात्रंदिवस कष्ट करणारा मजूरवर्ग, कामगारवर्ग कष्टाशिवाय फळ मिळत नाही. कष्टाविण फळ नाही. एक उदाहरण आहे. झोपलेल्या सिंहाच्या तोंडी आपोआप मृग वा त्याचे भक्ष येत नसते. त्याला कष्ट, प्रयत्न करावेच लागतात.

                                                          “ उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः

नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः "

   विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, अभिनेते, शास्त्रज्ञ, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, कामगार प्रत्येकालाच कष्टाचे महत्त्व कळाले. ते आपल्या जीवनात खूप यशस्वी होतात. कष्टाकडे दुर्लक्ष केल्यास आणि केवळ यशाची अपेक्षा केल्यास ती पूर्ण होत नसते. हात फिरेल तेथे लक्ष्मी असते, लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची हिंमत पाहिजे. वाक्यातून कष्ट करणे, अंगमेहनत करणे या गोष्टीच सूचित करायच्या असतात. "केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे" असं म्हणतात "उद्योग, साहस, धैर्य, बुध्दि, शक्ति आणि पराक्रम" जेथे आहे तेथे परमेश्वर सहाय्य करतो. उद्योगाचे घरी ऋधिसिद्धी पाणी भरी असे म्हणतात. उद्योग म्हणजे प्रयत्न कष्ट, मेहनत होय.

  आज भारताची प्रगतिपथाकडे सर्व क्षेत्रांत वाटचाल सुरू आहे. भारत महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे हे केवळ कष्ट करणाऱ्या भारतीयांमुळेच. म्हणून प्रत्येक मानवाच्या जीवनाचा मूलाधार कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे. जीवनावर निष्ठा असेल तर कष्ट करा. अगदी व्यायाम, योगा सुद्धा प्रयत्नाशिवाय, कष्टाशिवाय शरीर निरोगी, निरामय होऊ शकत नाही म्हणून कष्टाशिवाय, श्रमाशिवाय पर्याय नाही म्हणूनच श्रमएव जयते!.

-समाप्त-

मित्रांनो श्रमाचे महत्व या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन