Skip to main content

"सूर्य नसता तर..." Essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

 "सूर्य नसता तर..." कल्पनात्मक मराठी निबंध "सूर्य नसता तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "सूर्य नसता तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.

    सूर्य नसता तर.. (सूर्य उगवला नाही तर..) निबंध

  पावसाळ्यात तीन-चार दिवसांत सूर्यदर्शनच झाले नाही. त्यामुळे सूर्य, दिनकर कधी दिसेल याची वाट पहात होते. उन्हाळ्यात त्राही त्राही करून सोडणारा सूर्य मुलांना तर नकोच वाटतो. या सूर्याच्या त्रासामुळे आई बाहेर खेळू देत नाही, ही एक तक्रार असते. सध्या तर ग्लोबल वॉर्मिंगचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत. अशावेळी माणूस स्वतः केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो आणि सूर्यच म्हणजे दुनियेचा दोस्तच त्याला दुश्मनासारखा वाटायला लागला आहे. त्यातूनच ही एक कल्पना मनात आली असेल ‘सूर्य उगवलाच नाही तर... 

   सूर्य हा पृथ्वीपासून जवळचा तारा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते . सूर्याच्या पृष्ठभागावरून जी ऊर्जा उत्सर्जित होते, त्यामुळे आपणास उष्णता आणि प्रकाश मिळतो. तापते वारे, वादळे निर्माण होतात, बाष्पीभवन होते, जलचक्र निर्माण होते. या सर्व घटना पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमण यामुळे आणि सौर ऊर्जेमुळे घडतात त्यामुळे मानवी जीवन अगदी सुरळीतपणे चालू आहे. दररोज येणारा सूर्य, सूर्योदय, माध्यान्ह आणि सूर्यास्त या विविध रूपातील सूर्य माणसास हितकारक आहे. 

सूर्याच्या प्रकाशामुळेच वनस्पती आपले स्वत:चे अन्न स्वत तयार करतात. वनस्पती, प्राणी यांचे जीवन सूर्यावरच अवलंबून आहे आणि सूर्य नसता तर ना वनस्पती उगवतील ना मानवास अन्न मिळेल. सूर्याच्या उगवण्याने माणसाच्या दिवसाची सुरुवात होते, अतिशय उत्साहाने, प्रेरणेने माणूस कामाला लागतो. सूर्य उगवलाच नाही तर माणसाची सुरुवात, दिवसाची सुरुवात, होणार नाही. कायम अंधार म्हणजे अधोगती, अज्ञान यांचाच प्रभाव, अन् प्रगतीचा अभाव दिसेल. चंद्राचं चांदणं सुद्धा सूर्याचीच देणगी आहे. ना चंद्र ना चांदणे, ना ग्रहणे, ना दिवस ना प्रकाश, सूर्य संपावर गेल्यावर अंधाराचेच साम्राज्य.

   हिरवे हिरवे गार गालीचे, त्यावर डोलणारी फुलराणी आणि तिचा प्रियकर म्हणजे सूर्याचा एक किरण यांचा सुंदर विवाह बालकवींना लावता आला असता काय ? सुर्य म्हणजे कर्वीच्या प्रतिभेचे स्फूल्लिंग, कल्पनाशक्तीचे मूलस्त्रोत, अंतर्मनाचा प्रकाश काव्यातून व्यक्त करण्यासाठी अनेक कवींना या प्रभाकरानेच मोहीत केले आहे. या हो सुर्यनारायणा म्हणून नमन करण्यापासून ते अस्तास जाणाऱ्या सूर्यावरून विरहाची रचना अनेक कवींनी केलेल्या आहेत त्या रचनाच सूचल्या नसत्या.

   सूर्य संपावर गेला तर सौरघट, सौरचूल, सोलर कुकर, सूर्याच्या तापमानावर चार्ज करून चालणारी यंत्रे मोडीत टाकावी लागली असती. सध्या सूर्य ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून ऊर्जेचे हे महत्त्वाचे साधन उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण इतर ऊर्जा साधने ही संपुष्टात येणारी आहेत. सूर्य नसता तर शास्त्रज्ञांनी असे शोध लावले नसते, सूर्य नसता तर उजेड नाही. सूर्य असतानाच भारनियमन चालू आहे नंतर वीज सुद्धा निर्माण करणे अशक्य होईल. सूर्य संपावर गेला तर ना शाळा ना अभ्यास. फक्त झोप आणि लोळणे, सहस्त्ररश्मी सूर्य आहे म्हणून घड्याळाच्या काटयावर, सकाळ -संध्याकाळ, व्यवस्थित जनजीवन सुरळीतपणे चालू आहे. सकाळ नाही, फुले उमलणार नाहीत, पक्षी उडणार नाही, घरात स्वयंपाक होणार नाही, आई , बाबा कामाला जाणार नाहीत आणि माझी तर शाळेला सुट्टीच असेल.

  सूर्यामुळे सृष्टीचक्र चालू आहे. आपल्याला मिळणारा प्राणवायू, वृक्षांचे प्रकाशसंश्लेषण, चेतविणारी हरितद्रव्ये आणि त्यातून मिळणारे माणसाचे अनमोल जगणे हे केवळ सूर्यामुळेच मिळालेले आहे. सूर्याशिवाय मानवी जीवनाचा विचार करणेच अशक्य आहे. ही कल्पनाच खुळी आहे. उन्हाळ्यात नकोसा वाटणारा सूर्य, पृथ्वीचे वाढते तापमान याला माणूसच कारणीभूत आहे. प्रदूषण वाढले आहे, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हिमखंड वितळत आहेत, ओझोनचे प्रमाण कमी होत आहे. यासाठी सूर्याला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही. तर मानवाने प्रयत्न करावा आणि त्यावरील उपाययोजना अंमलात आणावी. सूर्य नसता तर, सूर्य उगवला नाही तर अशा कल्पना करण्यापेक्षा तोच आपला दाता आहे. आणि नेता आहे. त्याच्याशी आपण प्रामाणिक असावे, असा हा आदित्य, मित्र त्याची थोरवी अमर्याद आहे म्हणून सूर्य नसता तर ही एक क्षणभरापूरतीच केलेली कल्पना  बरी अन्यथा सुर्याशिवाय जीवन हे जीवनच असू शकत नाही.

-समाप्त-

मित्रांनो "सूर्य नसता तर.." या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 


Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन