Skip to main content

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

 वाचन एक छंद वैचारिक मराठी निबंध
वाचन एक छंद " हा एक कल वैचारिक निबंध आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला "वाचन एक छंद" हा निबंध वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.

 वाचन एक छंद निबंध

     'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.

 माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवनाची जडणघडण पुस्तकामुळेच होत असते. वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके, पुस्तके, ग्रंथ इ. विविध माध्यमातून मानवाला ज्ञान मिळते. माणसाची बौध्दिक, भावनिक, मानसिक भूक भागविली जाते ती चांगल्या पुस्तकामुळेच. सुंदर पुस्तके आपला अनमोल ठेवा असतो. ग्रंथ हेच आपले गुरू असतात,  मित्र  असतात, मार्गदर्शक असतात आणि आपले मनोरंजनही करत असतात म्हणून वाचनाची मला सवय लागली. वाचनामुळे मानव विविध विषयाचे ज्ञान मिळवितो. 

 "वाचनेन एव मनुजा, बहून विषयान बोधन्ते  

वाचनेन कार्येषु दक्षः बहुक्षुतः भवन्ति" 

      वाचनामुळे मानव कामात कुशल व विद्वान होतात असे महत्त्व या संस्कृत वाचनातून दिसून येते. विविध प्रकारच्या वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांनी म्हणूनच म्हटले असेल, 'वाचाल तर वाचाल' वाचनाने बुध्दी समृध्द होते, ज्ञानभांडार वाढते, व्यक्तिमत्त्व प्रभावी बनते. उच्चारावर विद्वत्ता ठरते, चांगल्या गुणांचा संचय होतो, उत्साह वाढतो. म्हणून वाचन मानवाच्या विकासासाठी अतिशय हितकारक आहे. जो सतत वाचत राहतो त्या संदर्भात एक संस्कृत वचन आहे ते पुढीलप्रमाणे,

  ये सदा वाचने रतः तान वाल्मीकिव्यासबाणाद्याः 

 प्राचीनः कविपण्डिता संततम् शिक्षयन्ति ।।

 जे नेहमी वाचनात रमलेले असतात त्यांना वाल्मीकी, व्यास, बाण इ. प्राचीन कवी व विद्वान नेहमी शिकवतात. वाचनाचा प्रत्येकानेच आश्रय घ्यावा, आधार घ्यावा. ज्यामुळे जीवनाचा मार्ग सुकर होतो.

  साने गुरुजींच्या 'शामची आई' या पुस्तकाची आवर्तने करणारी वाचक मंडळी आहेत. हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, रुक्मिणीस्वयंवर, गजानन, चिंतामणी, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध अशा प्रकारे ग्रंथ मनाला प्रसन्न करतात. 'मृत्युंजय' सारखी कादंबरी हातातून सोडवतच नाही. वि.स.खांडेकर, ना.सी.फडके यांच्या कथा कादंबऱ्या, नाटक, कविता, निबंध, लघुनिबंध, लेख, अग्रलेख, टीका कोणताही प्रकार वाचल्यानंतर मनाला बरे वाटते. हलकेफुलके लेखन असेल तर करमणूक होते. गंभीर विषय असेल तर मन अंतर्मुख बनते. जगातील दुःख, दैन्य, अन्याय, अत्याचार त्यात होरपळणारा माणूस वाचला तर मन सुन्न होते.  

   वाचल्याशिवाय जगात, देशात, शहरात कोठे काय चाललेले आहे हे समजत नाही. वाचनाचे अनन्यसाधारण असलेले महत्त्व लोकांना अजूनही समजलेले नाही. ते समजण्यासाठीच तर 'गाव तेथे ग्रंथालय' ही चळवळ झालेली आहे. वाचन ही एक साधनाच आहे. सरस्वतीच्या मंदिरातील ती एक उपासना आहे. म्हणूनच समर्थांनी प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे म्हटलेले आहे. ही वाचनाची सवय लहानपणापासूनच लावली पाहिजे कारण,

  "बाल्ये वाचनम् ज्ञानदम्, तारुण्ये शीलरक्षकम्, 

   वार्धके दुःख हरणम्, सद्ग्रन्थवाचनम् हितम्"  

बालपणात वाचन ज्ञान देणारे, तारुण्यात चारित्र्य रक्षण करणारे, म्हातारपणी दुःख दूर करणारे असते. चांगल्या ग्रंथाचे वाचन कल्याणकारक असते.

    मानवी जीवन म्हणजे सध्या दुःखाने जळत राहणार बनलेलं आहे. या जीवनातील ज्वलन शांत करण्याचं सामर्थ्य फक्त पुस्तकातच आहे. काही पुस्तके तर झोपताना सुध्दा उशाशी ठेवावीशी वाटतात. काही पुस्तकांना तर अमरत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून अशी पुस्तके अक्षर साहित्यात मोडली जातात. अशा दुःखाने बरबटलेल्या जगात जर सुखाचा शोध घ्यायचा असेल तर चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. समृध्द घर जे की, ज्या घरात चांगली पुस्तके आहेत अन्यथा ते घर म्हणजे जणू अंधार कोठडी. चांगल्या पुस्तकाचा संचय हा वाचनातून केला जातो. सुंदर पुस्तक हाताळल्यावर, पाहिल्यावर जर नेत्रसुख मिळत असेल, ते वाचल्यानंतर मनःशांती मिळेल हे सांगायची गरज नाही. जिथे जिथे आणि जे काही वाचायला मिळते ते वाचावे. एखादा ग्रंथ असेल, पाकसाधना असेल, सौंदर्यसाधना असेल, लेखनसाधना, वाचनसाधना किंवा कोणत्याही खेळाचे समालोचन, वाचन राहिल्यामुळे वाद, कटकटी, भांडणं होणार नाहीत उलट आपण इतरांचे आदर्श बनतो.  

-समाप्त-

मित्रांनो "वाचन एक छंद " या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Also read : 
Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला