Skip to main content

वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान मराठी निबंधलेखन | Marathi Essay Writing

 

वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान वर्णनात्मक मराठी निबंधलेखन(" वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान..." हा एक वर्णनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला "वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान..." हा निबंध वर्णनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.)

 वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान


  वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे | संत तुकारामांचा हा अभंग प्रत्येकालाच आवडतो, वृक्ष हीच देवता, वनश्री हीच धनश्री, एक मूल एक झाड अशा प्रकारची वचने, विचार केवळ ऐकून किंवा वाचून चालणार नाही तर वृक्षलागवड करुन त्यांची जोपासना केली पाहिजे. वृक्षाचे संगोपन करणे, संरक्षण करणे है फार महत्त्वाचे आहे कारण वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान अन्यसाधरण आहे व खुप महत्वाचे आहे.

  वृक्ष ही नैसर्गिक साधनसंपत्ति आहे. वृक्षामुळे आपल्याला प्राणवायु मिळतो परंतु आजच्या या अफाट वाढलेल्या लोकसांखेमुळे वृक्षतोड़ मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे शुध्द हवा मिळत नाही, प्रदूषण वाढत आहे, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, ओझोनचा थर कमी होत आहे, पृथ्वीचे तापमान वाढले आहे त्यामुळे बर्फाचे वितळणे वाढून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. अशी संकटांची मालिका केवळ वृक्षतोडीमुळे होत आहे. वृक्षांचा उपयोग इंधनासाठी होतो, इमारत बांधणीसाठी होतो, फर्निचर तयार करणे, कलाकुसरीच्या वस्तू तयार करणे, औषधांसाठी, कागदनिर्मिती, जहाजबांधणी अशा विविध गोष्टींसाठी मानव वृक्षाचा पुरेपूर उपयोग करून घेत आहे.

 कोकणातील समुद्रकाठचा कल्पवृक्ष 'माड' म्हणजे नारळ. या फळास धार्मिक आणि आरोग्य आहाराच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. आंबा, चिंच, बाभूळ, वड, निंब, निलगिरी, चंदन, सागवान, शिश, खैर, सुंद्री अशा विविध प्रकारच्या वृक्षामुळे जमिनीची धूप होत नाही. वृक्षामुळे वाऱ्याचा वेग कमी होतो, महापुरावर नियंत्रण आणता येते. वृक्षामुळे पाणी जमिनीत मुरते, अशा प्रकारे पर्यावरणाचा समतोल वृक्षामुळेच राखला जातो. तापमानाची तीव्रता कमी करण्यासाठी वृक्षांची लागवड केली जाते. सध्या पावसाचे स्वरूप अनियमित व अनिश्चित झाले आहे. एकीकडे महापुराची तर दुसरीकडे दुष्का:ळाची स्थिति असते. सध्या शेतकरी संकटात आहे. याला कारणीभूत पूर्ण मानवसमाज आहे. पाऊस नाही, पीक नाही, पैसा नाही, मूलभूत गरजा भागत नाहीत म्हणून आत्महत्या होत आहेत. त्यासाठी पाऊस वेळेवर यावा म्हणून प्रार्थना, यज्ञ, होम, हवन करण्यापेक्षा वनसंधारणावर प्रत्येकानेच लक्ष दिले तरच ही समस्या, त्याची तीव्रता कमी होईल. 

  हिरडा, बेहडा, तुळस, पळस, शतावरी, निलगिरी या वृक्षांना आयुर्वेदात अत्यंत महत्त्व आहे. बुध्दी, स्मृती ताजी ठेवण्यासाठी आरोग्य चांगले, सुदृढ राहण्यासाठी विविध विकारांवर उपयोगी ही वृक्षे आहेत. फुला- फळांपासून ते मुळांपर्यंत वृक्षाचा प्रत्येक अवयव मानवासाठी महत्वाचा असतो. माणूस मात्र त्याचीच तोड करत आहे.

झाड म्हणतं झारा दे
 पाखरू म्हणतं चारा दे।

 प्राणी, पक्षी वनात राहतात. वृक्षतोड झाल्याने त्यांचेही अस्तित्व धोक्यात आलेले आहे. काही प्राण्यांच्या जातीच नामशेष झालेल्या आहेत. निसर्गाची ही देणगी माणूस उद्ध्वस्त करत आहे. निसर्गाचा -हास होत आहे. हा -हास थांबविण्यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे कारण वृक्षाशिवाय आज माणूस जगूच शकत नाही.

-समाप्त-

मित्रांनो "वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान" या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Also read : 

Comments

Popular posts from this blog

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मला पंख असते तर..." Essay in marathi | मराठी निबंधलेखन

"मला पंख असते तर"  कल्पनात्मक मराठी निबंध " मला पंख असते तर.."  हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला  " मला पंख असते तर.."  हा  निबंध  कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे .   मला पंख असते तर..  मी पक्षी असतो तर....     उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी घरात बसवत नव्हते म्हणून आईजवळ हट्ट केला आणि आईला घेऊन एका बागेत जाण्याचा निर्णय घेतला.. मी प्रथम पशुपक्ष्यांच्या पिंजऱ्यातील वेगवेगळ्या रंगांचे पक्षी पाहण्यात गुंग झालो. त्यावेळी वाटले   “आकाशी झेप घे रे पाखरा   सोडी सोन्याचा पिंजरा"    या पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांचे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले, याचे खूप वाईट वाटले. मी त्या पिंजऱ्यातील पक्ष्यात स्वत:ला शोधू लागलो. तेव्हा मला वाटले मी पक्षी असतो, मला पंख असते तर.. मी असा पिंजऱ्यात अडकून राहिलोच नसतो. सर्व बंधने झुगारून उंच भरारी घेतली असती, मानवाने केलेला अन्याय झटकला असता आणि भुर्रकन उडून  गेलो असतो.     मला पंख असते तर 'सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्' अशा आशेतून हिमालय