Skip to main content

माझी आई वर्णनात्मक मराठी निबंध | My Mother Essay in marathi

 "माझी आई"  वर्णनात्मक मराठी निबंध


माझी आई निबंध

माझी आई.." हा एक वर्णनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला "माझी आई.." हा निबंध वर्णनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.

माझी आई निबंध

अनमोल जिची प्रीती | ती माताच माझी भक्ती ।

 वात्सल्याची सगुणमूर्ती । ज्ञानाची मिळते स्फूर्ती ।

  दिव्य अशी जिची प्रचिती । तेथे कर माझे जुळती | 


  आई म्हणजे सहिष्णुतेचं नाव, ममतेचं गाव, एकमेव सुंदर शब्द, परमेश्वराची मूर्ती. ईश्वराचा सर्व ठिकाणी, सर्व कुटुंबात प्रत्यक्ष सहवास शक्य नसल्याने आपला प्रतिनिधी म्हणून त्याने वात्सल्यमूर्ती मातेची योजना केलेली असावी. आई म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची साक्षात प्रतिकृती आहे. परमेश्वराचे अस्तित्वसुद्धा आईविना अशक्य आहे.  

  कवि यशवंतांनी म्हटल्याप्रमाणे 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'  या आईच्या प्रेमाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक आई आपल्या चंद्रकलेप्रमाणे वाढणाऱ्या बाळाच्या संगोपनासाठी, त्याच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करत असते. ती आपल्या बाळाला ममतेने, आपुलकीने, स्नेहार्द भावनेने घडवीत असते. वेळप्रसंगी कठोर बनून कुशल शिल्पकाराप्रमाणे संस्कार करून अत्यंत सुशील, सुजाण नागरिक ती बनविते. मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत करते. 

  आईची महती, आईचे उपकार, श्रेष्ठत्व व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात.''आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही” असे अनन्यसाधारण महत्त्व जिला लाभलेले आहे ती प्रेमस्वरूप वात्सल्यसिंधू जननि सर्वश्रेष्ठ आहे. जननि आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत हे रामायणातून आपण वाचलेले आहे. आई आपल्या बाळावर सुसंस्काराचे बीजारोपण करते. सद्गुण  विकसित करते. मानवधर्म, दया, प्रेम, करुणा, भूतदया, मित्रप्रेम यांचे धडे देते म्हणूनच तिला पहिली गुरू असे म्हटले जाते.

  “मातृदेवो भव।

पितृदेवो भव।

  आचार्य देवो भव" ।

  'यातील मातृदेवो भव' सर्वोच्च स्थानी आहे. जिच्या चरणी नतमस्तक व्हावे असे चरणकमल मातेचेच. प्रत्येक घरातील स्फूर्तीस्थान म्हणजे आई असते. आपल्या घरादारासाठी दु:खाचा डोंगर पेलणारी ती आईच असते म्हणून तिच्या रूपातून परमेश्वर दिसतो. एका चित्रपटात परमेश्वराचे रूप म्हणजे आईवडील असे वर्णन करणारे गीत अतिशय सुंदर आहे,

 ये तो सच है के भगवान है

 है मगर फिर भी अनजान है।

  धरती पे रूप माँ बाप का

  उस विधाता की पहचान है। 

  जगात परमेश्वर आहे की नाही यावर आस्तिक आणि नास्तिक यांच्यात नेहमी वादविवाद होतात, पण हे वैचारिक मतभेद करण्यापेक्षा परमेश्वर आहे असेच मानणे हे संयुक्तिक ठरेल. कारण परमेश्वर म्हणजे आई आणि आई म्हणजे परमेश्वर. परमेश्वराने जग निर्माण केले असेल; परंतु माणसाला मात्र आईनेच निर्माण केले आहे. माँ, माता, जननि, जन्मदा, जन्मदात्री म्हणून ती जगात पूजनीय आहे. भूमाता, गोमाता, जगन्माता या सुध्दा माताच आहेत. परमेश्वराला भक्तसुध्दा माता मानतात. उदा. माझी विठाई माऊली म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाला सुध्दा आई म्हटले आहे. कारण आई मायाळू, दयाळू आहे. ज्ञानेश्वरांना ज्ञानाई म्हटले आहे. संतांचे सुध्दा आईरूप अभंगातून दिसते. अलिकडील मम्मी या शब्दापेक्षा आई या शब्दात अतिशय गोडवा, प्रेम, आपुलकी, माधुर्य आहे.

-समाप्त-

मित्रांनो "माझी आई.." या विषयावरचा निबंध तुम्हाला आवडला आहे का ? यातील काही गोष्टीत बदल करावा अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला खाली कॉम्मेंट करून नक्की सांगा.

!! धन्यवाद !! 

Also read : 

Comments

Popular posts from this blog

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मला पंख असते तर..." Essay in marathi | मराठी निबंधलेखन

"मला पंख असते तर"  कल्पनात्मक मराठी निबंध " मला पंख असते तर.."  हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला  " मला पंख असते तर.."  हा  निबंध  कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे .   मला पंख असते तर..  मी पक्षी असतो तर....     उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी घरात बसवत नव्हते म्हणून आईजवळ हट्ट केला आणि आईला घेऊन एका बागेत जाण्याचा निर्णय घेतला.. मी प्रथम पशुपक्ष्यांच्या पिंजऱ्यातील वेगवेगळ्या रंगांचे पक्षी पाहण्यात गुंग झालो. त्यावेळी वाटले   “आकाशी झेप घे रे पाखरा   सोडी सोन्याचा पिंजरा"    या पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांचे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले, याचे खूप वाईट वाटले. मी त्या पिंजऱ्यातील पक्ष्यात स्वत:ला शोधू लागलो. तेव्हा मला वाटले मी पक्षी असतो, मला पंख असते तर.. मी असा पिंजऱ्यात अडकून राहिलोच नसतो. सर्व बंधने झुगारून उंच भरारी घेतली असती, मानवाने केलेला अन्याय झटकला असता आणि भुर्रकन उडून  गेलो असतो.     मला पंख असते तर 'सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्' अशा आशेतून हिमालय