Skip to main content

अलंकार (मराठी व्याकरण) शब्दालंकार,अर्थालंकार

 अलंकार (मराठी व्याकरण )अलंकार याचा अर्थ दागिना, दागिना हा शब्द म्हटला की स्त्री आणि तिचं सौंदर्य आणि त्या सौंदर्यात दागिन्याने टाकलेली भर हे दृश्य समोर येते. एखादी स्त्री खूप सुंदर असली तरी ती जर सुंदर, मोहक अशा दागिन्यांनी नटलेली दिसली तर ती आणखीनच मोहक दिसते तद्वत भाषा सुद्धा शब्दांच्या आणि अर्थाच्या दृष्टीने समृद्धपणे सजविली तर ती खूपच आकर्षक दिसते. भाषेचे दोन अलंकार आहेत.

१) शब्दालंकार

२) अर्थालंकार


१) शब्दालंकार - शब्दाच्या वापरामुळे शब्दचमत्कृती घडत असते तेथे शब्दालंकार होतो.

उदा. मातीच्या गोळ्याला देते आकार

हाडा मासाच्या धडावर करते संस्कार

बाळाच्या प्रेमाला करते साकार

आई थोर तुझे उपकार ।

या ओळींमधून यमक दिसून येतो त्यामुळे ही रचना आकर्षक वाटते.


२) अर्थालंकार - अर्थालंकारात अर्थचमत्कृती असते. अर्थामुळे रचनेचे सौंदर्य खुलून दिसते.

उदा. गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात ।

शब्दालंकार व अर्थालंकाराचे प्रकार अभ्यासू.


१. दृष्टांत :- 

व्याख्या : एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.

दृष्टांत अलंकारात दोन्ही विधाने समान तोलाची असतात. त्यात प्रधान व गौण असा भेद नसतो. साम्य असले तरी त्यात साम्यवाचक शब्द नसतो. फक्त स्पष्टीकरण दिलेले असते.

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत दृष्टांत अलंकाराची पखरण झालेली दिसते.

उदा : 

१. चंद्रु तेथ चंद्रिका । शंभु तेथ अंबिका ।

संत तेथ विवेका । असणे की जे ।

२. भाग्य तेथ विलासू । सुख तेथ उल्हासू

हे असो तेथ प्रकाशू । सूर्यो जेथ ।

३. लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।

४. न कळत पद अग्नीवर पडे ।

न करी दाह असे न मुळी घडे

अजित नाम वदो भलता मिसे

सकल पातक भस्म होतसे ।

५. जैशी का समीरे सकट गती । का सोनिया सकट कांती

तैशी शीवेशी शक्ति । अवघीच


२. श्लेष

एकच शब्द वाक्यात एकापेक्षा अधिक अर्थाने वापरल्यानंतर जेंव्हा शब्दचमत्कृती

होते तेंव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा

१. ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले औषध नलगे मजला.

२. शंकराशी पुजिले सुमनाने.

३. श्रीकृष्ण नवरा मी नवरी

शिशुपाल नवरा मी न-वरी ।

४. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस.

५. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही 

६. मला सुपारी लागते.

७. अवधूत गुप्ते (गायक) चांगल्या चालीचा आहे.

८. कुस्करु नका ही सुमने.


३. अनन्वय

जेंव्हा उपमेयाची उपमा उपमेयालाच दिली जाते तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय म्हणजे संबंध अन् अन्वय म्हणजे संबंध नाही. म्हणजे उपमेय व उपमान यांची तुलना करण्याचा संबंध नसतो कारण उपमेयाची तुलना उपमेयाशीच केलेली असते.

उदा

१. कर्णासारखा दानशूर कर्णच.

२. सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू सचिनच.

३. झाले बहु, आहेत बहु, होतील बहु,

    परंतु या सम हा । (मोरोपंत - अर्जुनासाठी)

४. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान ।

5.आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी ।


४. स्वभावोक्ती

१. भिंत खचली, कलथून खांब गेला

जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा

तिच्या कौलारी बसुनि पारवा तो

खिन्न नीरस एकांतगी गातो

२. गणपत वाणी विडी पिताना

चावायचा नुसतीच काडी

म्हणायचा अन् मनाशीच की,

ह्या जागेवर बांधीन माडी

बालकवीनी एकांतगीत गात असलेल्या पारव्याचे हुबेहूब वर्णन पारवा या कवितेत केले आहे आणि मकरांनी गणपत वाण्याचे वर्णन गणपत वाणी या कवितेत केले आहे. या दोन्ही उदाहरणावरून पारव्याचे व वाण्याचे हुबेहूब वर्णन, त्यांची मानसिकता, त्यांचे विचार, यांचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले आहे. त्यातून त्यांच्या स्वभावावरसुद्धा प्रकाश टाकलेला आहे म्हणूनच त्यास स्वभावोक्ती अलंकार म्हणतात.

एखाद्या व्यक्तीचे, प्राण्यांचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे वैशिष्ट्यपूर्ण, प्रभावी, हुबेहूब वर्णन केलेले असते तेंव्हा स्वभावोक्ती अलंकार असतो.

विशेष क्रियेचे किंवा अविर्भावाचे हुबेहूब व रम्य वर्णन असते.

उदा

३. मातीत ते पसरले अति रम्य पंख

केले वरी उदर पांडुर निष्कलंक

चंचू तशीच उघडी पद लांबवीले

निष्प्राण देह पडला श्रम ही निमाले

४. चिमुकली पगडी झळके शिरी

चिमुकली तरवार करी धरी

चिमुकला शोभत बहु चोळणा

चिमुकला सरदार निघे रणा।

Comments

Popular posts from this blog

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व