Skip to main content

Posts

Showing posts with the label अलंकार

अलंकार (मराठी व्याकरण) शब्दालंकार,अर्थालंकार

  अलंकार (मराठी  व्याकरण  ) अलंकार याचा अर्थ दागिना, दागिना हा शब्द म्हटला की स्त्री आणि तिचं सौंदर्य आणि त्या सौंदर्यात दागिन्याने टाकलेली भर हे दृश्य समोर येते. एखादी स्त्री खूप सुंदर असली तरी ती जर सुंदर, मोहक अशा दागिन्यांनी नटलेली दिसली तर ती आणखीनच मोहक दिसते तद्वत भाषा सुद्धा शब्दांच्या आणि अर्थाच्या दृष्टीने समृद्धपणे सजविली तर ती खूपच आकर्षक दिसते. भाषेचे दोन अलंकार आहेत. १) शब्दालंकार २) अर्थालंकार १)  शब्दालंकार  - शब्दाच्या वापरामुळे शब्दचमत्कृती घडत असते तेथे शब्दालंकार होतो. उदा. मातीच्या गोळ्याला देते आकार हाडा मासाच्या धडावर करते संस्कार बाळाच्या प्रेमाला करते साकार आई थोर तुझे उपकार । या ओळींमधून यमक दिसून येतो त्यामुळे ही रचना आकर्षक वाटते. २)  अर्थालंकार  - अर्थालंकारात अर्थचमत्कृती असते. अर्थामुळे रचनेचे सौंदर्य खुलून दिसते. उदा. गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात । शब्दालंकार व अर्थालंकाराचे प्रकार अभ्यासू. १. दृष्टांत :-  व्याख्या : एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा