Skip to main content

Posts

Showing posts with the label आत्मकथनात्मक निबंध

रेडिओचे मनोगत essay in marathi । मराठी निबंधलेखन

  रेडिओचे मनोगत"    आत्मकथानात्मक मराठी निबंध "रेडिओचे मनोगत"  हा एक  आत्मकथानात्मक निबंध  आहे. आत्मकथानात्मक निबंधात आपल्याला एखाद्या घडलेल्या गोष्टीचे वर्णन क रायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला " रेडिओचे मनोगत " हा  निबंध  आत्मकथानात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. रेडिओचे मनोगत : मी रेडिओ बोलतोय...      आजकाल दूरदर्शन, संगणकाचे महत्त्व वाढत आहे. घराघरात दूरदर्शनचे संच आणि सुशिक्षित, व्यावसायिक, अभियांत्रिकी, ज्ञानसंपन्न घरात संगणकाचे वर्चस्व दिसत आहे. पूर्वी घराघरात दिसणारा रेडिओ आता जास्त दिसत नसला तरी आकाशवाणीचे, रेडिओचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजही बहुतांश घरातील दिवसाची सुरुवात रेडिओवरील सुंदर अशा सनईवादनाने, त्याच्या नादमय आवाजाने आणि प्रसन्न वातावरणनिर्मितीने होत असते. रेडिओचा अजूनही श्रोतावर्ग, रसिकवर्ग चाहता आहे. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची, आपले गुज व्यक्त करण्याची इच्छा मी एक रसिक, एक श्रोता म्हणून रेडिओने केली आणि मी रेडिओचे मनोगत ऐकू लागलो.     “आकाशवाणी पुणे-सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे.” हे वाक्य ऐकून घ

राष्ट्रध्वज्याचे मनोगत मराठीत निबंध | मराठी निबंधलेखन | आत्मकथानात्मक मराठी निबंध

  राष्ट्रध्वज्याचे  मनोगत  आत्मकथानात्मक मराठी निबंध "राष्ट्रध्वज्याचे मनोगत " हा एक  आत्मकथानात्मक निबंध  आहे. आत्मकथानात्मक निबंधात आपल्याला एखाद्या घडलेल्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला  "राष्ट्रध्वज्याचे मनोगत"  हा  निबंध  आत्मकथानात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. राष्ट्रध्वज्याचे मनोगत : मी राष्ट्रध्वज बोलत आहे..   अजिंक्य भारत, अजिंक्य जनता    ललकारत सारे  ध्वज विजयाचा उंच धरा रे   उंच धरा रे ।।       हे योगेश्वर अभ्यंकर यांचे गीत आम्ही अगदी उत्साहाने, जल्लोषाने, स्फूर्तीने सादर केले. आमच्या हातात ध्वज होता. त्या ध्वजाकडे सर्वाचे लक्ष होते. आमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आमचे मार्गदर्शक घेत होते. गीत संपल्यानंतर आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसलो. प्रशालेच्या प्रांगणात, मध्यभागी अगदी दिमाखाने राष्ट्रध्वज फडकत होता, भाषणे चालली होती. इतक्यात माझ्या हातातील ध्वज मला काहीतरी सांगण्याच्या मन:स्थितीत होता हे मी जाणले आहे. त्याची कहाणी मी एकू लागलो.      आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी अनेकांनी जिवाची पर्वा

भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंधलेखन | Essay in Marathi

  "भूकंपग्रस्ताचे मनोगत"   आत्मकथानात्मक मराठी निबंध "भूकंपग्रस्ताचे मनोगत"  हा एक कल  आत्मकथानात्मक निबंध  आहे. आत्मकथानात्मक निबंधात आपल्याला एखाद्या घडलेेल्या गोष्टीचे वर्णन करायचे असते. खाली दिलेला " भूकंपग्रस्ताचे मनोगत " हा  निबंध  आत्मकथानात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.   भूकंपग्रस्ताचे मनोगत निबंध  आज अनंतचतुर्दशी, गणपती बाप्पाला निरोप, वाजत गाजत निघालेल्या मिरवणुका, झांज, लेझीम, बर्थी पथकांची नयनरम्य सादर केलेली नृत्ये, गुलालांची उधळण, विसर्जनाच्या ठिकाणी "सूखकर्ता दु:खहर्ता...' ही दुमदुमणारी आरती आणि गणरायाला दिलेला भावपूर्ण निरोप अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. संपूर्ण महाराष्ट्राला दु:खाच्या सागरात लोटणारा भूकंप झाला. लातूर शहरातील किल्लारी परिसरातील ३० सप्टेंबरची रात्र ही काळरात्र ठरली. असा साश्रू नयनांनी विचार करत असलेला समीर माझ्याशी बोलत होता.   समीर पुढे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतो, 'त्या दिवशीचा पहाटे सव्वाचार वाजता झालेला भूकंप खूप भयंकर होता. धरणीकंप काय असतो ? आणि का होतो? मला तर हा शब्दच माहित नव्हता. त्या दिवशी पहाटे अचा

शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंधलेखन | आत्मकथनात्मक मराठी निबंध

  "शेतकऱ्याची आत्मकथा" आत्मकथनात्मक मराठी निबंध  शेतकऱ्याची आत्मकथा निबंध  "शेतकऱ्याची आत्मकथा" हा एक आत्मकथनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या  घडलेल्या  गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला "शेतकऱ्याची आत्मकथा" हा निबंध आत्मकथनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. शेतकऱ्याची आत्मकथा निबंध   सुट्टीत गावाकडे, खेडेगावी जाण्याचा योग आला. आई, बाबा आम्ही सर्वजण मामाच्या गावी गेलो. माझा मामा जसा शेतकरी आहे, तसेच बहुसंख्य लोक शेतीवरच आपले जीवन कंठत आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पूर हे मला फक्त वर्तमानपत्रात वाचून माहित होते. परंतु या संकटाचा आणि निसर्गातील बदलांचा किती मोठा परिणाम शेतकऱ्यावर होतो याची जाणीव गणपाकाकाच्या मनोगतातूनच झाली.   संध्याकाळची वेळ होती. शेताकडे जाण्यासाठी मी निघालो असताना शेतीच्या बांधावर बसलेले काका मला दिसले आणि मी थोड्याशा गप्पा मारण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसलो तर त्यांनी आपली आत्मकथा सांगितली. ते म्हणाले, अरे बाळा तू शहरात राहतो. खेडेगाव, आमची शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न तुला माहित