Skip to main content

Posts

Showing posts with the label कल्पनात्मक निबंध

"मी मुख्यमंत्री झालो तर... " essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  मी मुख्यमंत्री झालो तर...  कल्पनात्मक मराठी निबंध " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " मी मुख्यमंत्री झालो तर.. " हा निबंध  कल्पनात्मक निबंधाचे  एक उदाहरण आहे.   मी मुख्यमंत्री झालो तर..कल्पनात्मक निबंध   विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार  या घटनेकडे लागून राहिले. प्रत्येक जण आपापला प्रयास करू लागले. सत्ताधारी पक्षातील दिग्गजांची नावे चर्चेत येऊ लागली असताना मलाही असे वाटले की मुख्यमंत्र्याचे पद किती महत्त्वाचे आहे, गौरवाचे आहे आणि मानाचे आहे. तो सन्मान आपल्याला मिळाला तर...मी मुख्यमंत्री झालो तर... या विचारात मी रंगून गेलो.   भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणे ही सामान्य बाब नसते. महाराष्ट्रातील सर्वांची मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा असते. हे पद अतिशय जबाबदारीचे असते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या यादीत माझे नाव सामील होणार याचा मला

"सूर्य नसता तर..." Essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

  "सूर्य नसता तर..."  कल्पनात्मक मराठी निबंध  " सूर्य नसता तर .." हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला " सूर्य नसता तर.. " हा  निबंध  कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे .      सूर्य नसता तर.. (सूर्य उगवला नाही तर..) निबंध   पावसाळ्यात तीन-चार दिवसांत सूर्यदर्शनच झाले नाही. त्यामुळे सूर्य, दिनकर कधी दिसेल याची वाट पहात होते. उन्हाळ्यात त्राही त्राही करून सोडणारा सूर्य मुलांना तर नकोच वाटतो. या सूर्याच्या त्रासामुळे आई बाहेर खेळू देत नाही, ही एक तक्रार असते. सध्या तर ग्लोबल वॉर्मिंगचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत. अशावेळी माणूस स्वतः केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो आणि सूर्यच म्हणजे दुनियेचा दोस्तच त्याला दुश्मनासारखा वाटायला लागला आहे. त्यातूनच ही एक कल्पना मनात आली असेल ‘सूर्य उगवलाच नाही तर...     सूर्य हा पृथ्वीपासून जवळचा तारा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते . सूर्याच्या पृष्ठभागावरून जी ऊर्जा उत्सर्जित होते, त्यामुळे आपणास उष्णता आणि प्रकाश मिळतो. तापते वारे, वादळे निर्माण होतात, बाष्पीभ

कवी नसते तर..Essay in Marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

" कवी नसते तर.."    कल्पनात्मक मराठी निबंध   " कवी नसते तर.."  हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला  " कवी नसते तर.."  हा  निबंध  कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. कवी नसते तर!.. निबंध  लहानपणापासून मला कविता खूप आवडतात. विशेष करून केशवसूत, कुसुमाग्रज, भा.रा.तांबे, माधव ज्युलियन, ग.दि.माडगूळकर, पद्मा गोळे यांच्या कविता आवडतात. कारण मला माझ्या वक्तृत्वात आणि निबंधलेखनात यांच्या कवितांनी सौंदर्य निर्माण करता येते. पण हे सौंदर्य ज्यांच्या कल्पनाशक्तीतून निर्माण होते, ते कवी रसिकांच्या मनाचा ठाव घेतात, मनाला प्रेरणा देतात, आत्मविश्वास निर्माण करतात, धीर देतात, मनोरंजन करतात, मार्गदर्शन करतात. मग अशा कविता नसत्या तर ? हा प्रश्न पडल्यास त्यास काय उत्तर? कविता या कवींमुळेच आणि कवी नसते तर ? कवि केशवसुतांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास   'आम्हाला वगळा गतप्रभ क्षणी होती तारांगणे  आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावर हे जीणे"  कविता म्हणजे तरी काय असते? मनातील भावभावनांचे, सुख- दुःखाचे शब्दचित्र

"मला पंख असते तर..." Essay in marathi | मराठी निबंधलेखन

"मला पंख असते तर"  कल्पनात्मक मराठी निबंध " मला पंख असते तर.."  हा एक  कल्पनात्मक निबंध  आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला  " मला पंख असते तर.."  हा  निबंध  कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे .   मला पंख असते तर..  मी पक्षी असतो तर....     उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी घरात बसवत नव्हते म्हणून आईजवळ हट्ट केला आणि आईला घेऊन एका बागेत जाण्याचा निर्णय घेतला.. मी प्रथम पशुपक्ष्यांच्या पिंजऱ्यातील वेगवेगळ्या रंगांचे पक्षी पाहण्यात गुंग झालो. त्यावेळी वाटले   “आकाशी झेप घे रे पाखरा   सोडी सोन्याचा पिंजरा"    या पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांचे स्वातंत्र्य माणसांनी हिरावून घेतले, याचे खूप वाईट वाटले. मी त्या पिंजऱ्यातील पक्ष्यात स्वत:ला शोधू लागलो. तेव्हा मला वाटले मी पक्षी असतो, मला पंख असते तर.. मी असा पिंजऱ्यात अडकून राहिलोच नसतो. सर्व बंधने झुगारून उंच भरारी घेतली असती, मानवाने केलेला अन्याय झटकला असता आणि भुर्रकन उडून  गेलो असतो.     मला पंख असते तर 'सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्' अशा आशेतून हिमालय

वर्तमानपत्रे बंद झाली तर essay in marathi | मराठी निबंधलेखन | कल्पनात्मक निबंध

"वर्तमानपत्रे बंद झाली तर"  कल्पनात्मक मराठी निबंध   "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा एक कल्पनात्मक निबंध आहे. कल्पनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची असते. खाली दिलेला "वर्तमानपत्रे बंद झाली तर.." हा निबंध कल्पनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. वर्तमानपत्रे बंद झाली तर.... वर्तमानपत्रे नसती तर...      दररोज सकाळी सहा-सव्वासहा वाजता 'पेपर' असा आवाज येतो आणि पटकन मी दरवाजा उघडून वर्तमानपत्र घेऊन वाचत बसतो. जगभरातल्या घडामोडी घरबसल्या समजतात परंतु आज पेपरवाला आलाच नाही. तास, दोन तास वाट पाहिली अगदी बेचैन झालो. वर्तमानपत्र वाचनाची इतकी सवय झाली होती की, ते वाचन माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाचनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आज पेपर न आल्यामुळे माझ्या मनात क्षणभर एक विचार आला की ही वर्तमानपत्रे बंद झाली तर .... बापरे! ही कल्पनाच करवत नाही. वर्तमान पत्रे बंद झाली तर आपल्या देशात, राज्यात, शहरात घडलेल्या घडामोडी, त्यांचे बरे-वाईट परिणाम समजणार नाहीत, कोणतीही माहिती मिळणार नाही.      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा व