Skip to main content

Posts

Showing posts with the label मन करा रे प्रसन्न

मन करा रे प्रसन्न मराठी निबंध | निबंधलेखन

मन करा रे प्रसन्न मराठी निबंधलेखन  ( " मन करा रे प्रसन्न..." हा एक वर्णनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला " मन करा रे प्रसन्न.." हा निबंध वर्णनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.) मन करा रे प्रसन्न निबंध     मन करा रे प्रसन्न | सर्व सिध्दीचे कारण || या संत तुकाराम महाराजांच्या विचाराची, अभंगाची आज जगालाच गरज आहे. मानवी जीवन आनंदी करणे, प्रसन्न करणे आज किती गरजेचे आहे याचा थोडासा विचार करू.    आजच्या २१ व्या शतकातील मानवी जीवन अतिशय धकाधकीचे झाले आहे. घड्याळाच्या तालावर आपले जीवन त्याला कंठावे लागते. तरी पण त्याचे ' मन' त्याला जपता येत नाही. आनंदापेक्षा दुःखच त्याच्या वाटेला येते, यावर मात करून इच्छित, अपेक्षापूर्तीसाठी आनंदाच्या राजमार्गाचा शोध घेतला पाहिजे. आनंद आणि दु: ख मानवाच्या मानसिकतेच्या दोन बाजू आहेत. मन आणि मानसिकता या समुद्राच्या लाटाप्रमाणे असतात. त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला की, त्या अधिक फेसाळतात. मनाला काबूत ठेवणे, ताब्यात ठेवणे तसे खूप कठीण असते. बहि