Skip to main content

Posts

Showing posts with the label माझा आवडता सण (वटपौर्णिमा)

माझा आवडता सण (होळी, गुढीपाडवा आणि वटपूर्णिमा) essay in marathi | निबंधलेखन

  माझा आवडता सण (होळी, गुढीपाडवा आणि वटपूर्णिमा)                                                          माझा आवडता सण होळी   वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे होळी थंडी संपुन उष्णता वातावरणात दाढण्याची सुरूवात या दिवसापासून होते. शरीरामधेही उष्णता, थंडाई पिण्याची प्रथा आहे. थंडाईमधे वापरली जाणारी दूध, गुलाबकळी, खसखस, काकडी, बदाम ही द्रव्ये थंड गुणाची व उष्णता कमी करणारी आहेत. तसेच होळीची पूजा करताना होळीमध्ये पुरणपोळी, पैसे, पानसुपारी,खोबरे, कापूर, नारळ, पानगळ मध्ये झडलेला पालापाचोळा, शेणाच्या गोवऱ्या मधे पेटविले जाते. यामध्ये निर्माण होणाऱ्या धूराचा परिणाम वातावरणातील वाढलेल्या कृमिवर होतो. जसे पौराणिक कथेनुसार लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, ढुंढा, पूतना ह्यासारख्या राक्षसांच्या दहणाची कथा आहे.      आयुर्वेदानुसार यांनाच ग्रहबाधा म्हटले आहे. ग्रहबाधा म्हणजे (सध्याचे Virus & Bacteria) यांचे दहण होते. कृषी संस्कृतीतील या सणाचे विशेष महत्व आहे. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्याची प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओव्य