Skip to main content

Posts

Showing posts with the label माझी आई

माझी आई वर्णनात्मक मराठी निबंध | My Mother Essay in marathi

  "माझी आई"    वर्णनात्मक मराठी निबंध माझी आई निबंध माझी आई.." हा एक वर्णनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला "माझी आई.." हा निबंध वर्णनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. माझी आई निबंध अनमोल जिची प्रीती | ती माताच माझी भक्ती ।  वात्सल्याची सगुणमूर्ती । ज्ञानाची मिळते स्फूर्ती ।   दिव्य अशी जिची प्रचिती । तेथे कर माझे जुळती |    आई म्हणजे सहिष्णुतेचं नाव, ममतेचं गाव, एकमेव सुंदर शब्द, परमेश्वराची मूर्ती. ईश्वराचा सर्व ठिकाणी, सर्व कुटुंबात प्रत्यक्ष सहवास शक्य नसल्याने आपला प्रतिनिधी म्हणून त्याने वात्सल्यमूर्ती मातेची योजना केलेली असावी. आई म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची साक्षात प्रतिकृती आहे. परमेश्वराचे अस्तित्वसुद्धा आईविना अशक्य आहे.     कवि यशवंतांनी म्हटल्याप्रमाणे 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'  या आईच्या प्रेमाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक आई आपल्या चंद्रकलेप्रमाणे वाढणाऱ्या बाळाच्या संगोपनासाठी, त्याच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करत असते. ती आपल