Skip to main content

Posts

Showing posts with the label रेडिओचे मनोगत

रेडिओचे मनोगत essay in marathi । मराठी निबंधलेखन

  रेडिओचे मनोगत"    आत्मकथानात्मक मराठी निबंध "रेडिओचे मनोगत"  हा एक  आत्मकथानात्मक निबंध  आहे. आत्मकथानात्मक निबंधात आपल्याला एखाद्या घडलेल्या गोष्टीचे वर्णन क रायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला " रेडिओचे मनोगत " हा  निबंध  आत्मकथानात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे. रेडिओचे मनोगत : मी रेडिओ बोलतोय...      आजकाल दूरदर्शन, संगणकाचे महत्त्व वाढत आहे. घराघरात दूरदर्शनचे संच आणि सुशिक्षित, व्यावसायिक, अभियांत्रिकी, ज्ञानसंपन्न घरात संगणकाचे वर्चस्व दिसत आहे. पूर्वी घराघरात दिसणारा रेडिओ आता जास्त दिसत नसला तरी आकाशवाणीचे, रेडिओचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजही बहुतांश घरातील दिवसाची सुरुवात रेडिओवरील सुंदर अशा सनईवादनाने, त्याच्या नादमय आवाजाने आणि प्रसन्न वातावरणनिर्मितीने होत असते. रेडिओचा अजूनही श्रोतावर्ग, रसिकवर्ग चाहता आहे. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची, आपले गुज व्यक्त करण्याची इच्छा मी एक रसिक, एक श्रोता म्हणून रेडिओने केली आणि मी रेडिओचे मनोगत ऐकू लागलो.     “आकाशवाणी पुणे-सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे.” हे वाक्य ऐकून घ