Skip to main content

Posts

Showing posts with the label वृक्षाचे मानवी जीवनातील

वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान मराठी निबंधलेखन | Marathi Essay Writing

  वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान  वर्णनात्मक मराठी निबंधलेखन ("  वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान... " हा एक  वर्णनात्मक निबंध  आहे. वर्णनात्मक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचे असते, त्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असते. खाली दिलेला "वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान..." हा निबंध वर्णनात्मक निबंधाचे एक उदाहरण आहे.)   वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान   वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे | संत तुकारामांचा हा अभंग प्रत्येकालाच आवडतो, वृक्ष हीच देवता, वनश्री हीच धनश्री, एक मूल एक झाड अशा प्रकारची वचने, विचार केवळ ऐकून किंवा वाचून चालणार नाही तर वृक्षलागवड करुन त्यांची जोपासना केली पाहिजे. वृक्षाचे संगोपन करणे, संरक्षण करणे है फार महत्त्वाचे आहे कारण वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान अन्यसाधरण आहे व खुप महत्वाचे आहे.   वृक्ष ही नैसर्गिक साधनसंपत्ति आहे. वृक्षामुळे आपल्याला प्राणवायु मिळतो परंतु आजच्या या अफाट वाढलेल्या लोकसांखेमुळे वृक्षतोड़ मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे शुध्द हवा मिळत नाही, प्रदूषण वाढत आहे, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, ओझोनचा थर कमी होत आहे,