Skip to main content

Posts

Showing posts with the label वैचारिक निबंध

"मुलगी शिकली प्रगती झाली" essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

मुलगी शिकली प्रगती झाली मराठी निबंध शाळेच्या अभ्यासासाठी किंवा परीक्षेत विचारला जाणारा सर्वात आवडता  निबंध म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली . मुलींच्या शिक्षणावर जितके लिहू तितके कमी आहे. खाली दिलेल्या  मुलगी शिकली प्रगती झाली या निबंधात  सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर विस्तारपणे लिहिले आहे. ह्या निबंधातून माणसाचे मुलींकडे बघण्याचा व त्यांना शिक्षण देण्याचा दृष्टिकोन सरळ होईल. मुलगी शिकली प्रगती झाली निबंध   " कळी उमलणार नाही जीवनरसावाचून मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून " या दोनच ओळी किती मार्मिक आहेत, किती बोलक्या आहेत. या दोन ओळीतून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सामावलेले आहे. एखादी कोवळी कळी उमलण्यासाठी आणि संपूर्ण फूल होऊन फुलण्यासाठी वेगवेगळ्या साधनांची, घटकांची आवश्यकता असते तसच मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची गरज असते. शिक्षणामुळे मुलींच्या व्यक्तिगत वि कासाबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक पर्यायाने राष्ट्रीय विकास होतो.    नेपोलियनने म्हटले होते की, मुलांच्या शिक्षणापेक्षा मुलींच्या शिक्षणाला मी प्राधान्य देईन कारण एक मुलगी शिकली तर तिच्याद्वारा एक कुटुंब सुशिक्षित होते.

श्रमाचे महत्त्व essay writting in marathi | मराठी निबंध |

  श्रमाचे महत्व  संपूर्ण  मराठी निबंध  खाली दिलेला आहे. हा  निबंध  शालेय अभ्यासासाठी किंवा मुख्य परीक्षेत विचारला जाऊ  शकतो.  श्रमाचे महत्व  या निबंधात सगळ्या गोष्टींचा समावेश केला आहे. खालील निबंधात काही काव्य पंक्तींचासुद्धा वापर करण्यात आला आहे.    श्रमाचे महत्त्व मराठीत निबंध    कवि ग.दि. माडगूळकरांनी म्हटले आहे कष्ट करणाऱ्यांमध्ये परमेश्वर असतो. जो उद्योग, व्यवसाय, मेहनत, कष्ट करतो त्यास परमेश्वर साह्य करत असतो. प्रत्येक देशाचा, व्यक्तीचा , समाजाचा विकास हा कष्ठाशिवाय, प्रयत्नाशिवाय होऊ शकत नाही. श्रमाशिवाय पर्याय नाही. अगदी नवजात अर्भकापासून ते वयोवृध्दापर्यंत प्रत्येकाला कोणते ना कोणते कष्ट करावेच लागतात. शारीरिक, बौद्धिक श्रम दोन्ही महत्त्वाचेच आहेत. कोणतेही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते, निकृष्ट नसते तर काम करणारे कमी प्रतीचे किंवा श्रेष्ठ असे समजू नये. कारण, श्रमो दाता, श्रमो नेता श्रमो माता पिता श्रमः। कर्ता कारयिता लोके ह्येको देवः परिश्रमः ।।    श्रम हाच दाता, नेता, माता, पिता, आणि कर्ता आहे. कोणतेही काम करण्यास लाजू नये. सर्व कामे समान आहेत. कोणतेही काम उत्स्फूर्तपणे करणे व

हुंडा एक अनिष्ठ प्रथा essay in marathi | मराठी निबंधलेखन

  हुंडा एक अनिष्ठ प्रथा मराठी निबंध "हुंडा एक अनिष्ठ प्रथा"  ही प्रथा पूर्वी पासून आपल्या भारतात आहे. लग्न म्हटलं की हुंडा हा प्रकार आलाच असे समजा. आज याच विषयावर विस्तारितपणे खाली  निबंध  दिलेला आहे. सगळे मुद्दे घेण्याचा प्रयत्न केला आहे.    हुंडा एक अनिष्ठ प्रथा निबंध  वर्तमानपत्र उघडले की, एखादी तरी हुंडाबळी ठरलेल्या स्त्रीची करुण कहाणी सांगणारी बातमी दिसते, आणि मन सुन्न होतं. दररोज कुठेना कुठे हुंडा घेण्यावरून वा देण्यावरून वादविवाद, त्यातून संघर्ष, संघर्षातून खून, मारामाऱ्या अशा घटनांची साखळीच दृष्टीस पडते. म्हणूनच की काय मुलगी झाली म्हटलं की आई-बापापासून इतर सर्व-जणच नाकं मुरडतात. मुलाचं स्वागत ज्या उत्साहानं, आनंदानं होतं तसं मुलीचं स्वागत होत नाही. सु शिक्षित असो वा अशिक्षित, दोन्ही वर्गात मुलींची हेळसांड होताना दिसते. जन्मल्या जन्मल्या मुलगी परक्याचं धन आणि मुलगा मात्र वंशाचा दिवा अशी मनाची धारणा असलेले माता पिता अज्ञानी, अविचारी असतात. मुलीला कमी लेखणे आणि मुलाला अति महत्त्व देणे यातूनच मुलींच्या भ्रूणहत्येपासून हुंडाबळीपर्यंत हत्येचे प्रमाण वाढलेले आहे.   हुंडा म्ह

"संतांची शिकवण" essay in marathi | मराठी निबंधलेखन |

  संतांची शिकवण   मराठी निबंध संतांची शिकवण  हा एक अत्यंत महत्त्वाचा  निबंध  आहे. खूप वेळा मुख्य परीक्षेतसुद्धा ह्यावर निबंध विचारला गेला आहे. खाली  संतांची शिकवण  या विषयावर विस्तारितपणे  निबंध  दिला आहे. नेमके मुद्दे व  संतांनी आपल्याला काय शिकवण  दिली आहे  हे सांगण्याचा पुर्णपणे प्रयत्न केला आहे.   संतांची शिकवण मराठी निबंध महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. “संत महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे विचार ऐकावे हाच सापडे बोध खरा"   संत म्हणजे केवळ देवाचे भजन करणारा एक भक्त असतो असे नाही तर सत् असे कार्य, चांगले कार्य करणारा. हे कार्य सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक असे असते. संतांच्या साहित्याची देणगी मराठी रसिकाला, साहित्यिकाला, वाचकाला, भक्ताला मिळालेली आहे. साहित्याच्या सानिध्यात सामान्य माणूस जर विचाराने वावरायला लागला तर निश्चित त्याच्या वैचारिक क्षमतेत परिसाचा स्पर्श झाल्याचे आढळेल. संत साहित्य हे माणसात सांस्कृतिक श्रीमंती आणते. जीवनाला उजाळा देणारी सुंदरता, समृद्धी देणारी, उत्तमोत्तम विचार देऊन मन सुयोग्य मार्गावर नेणारी संतांची

पाणी अडवा- पाणी जिरवा essay in Marathi | निबंधलेखन | मराठी निबंध

  "पाणी अडवा- पाणी जिरवा"  वैचारिक मराठी निबंध  " पाणी अडवा- पाणी जिरवा..."  हा एक  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व सांगायचे असते, त्या गोष्टींची गरज पटवून द्यायची असते. खाली दिलेला  " पाणी अडवा- पाणी जिरवा..."  हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे . पाणी अडवा- पाणी जिरवा  निबंध       मुंबईला आलेला महापूर आणि दक्षिण भारतातील दुष्काळ या अलीकडील दोन्ही घटनांचा विचार करता अशी परिस्थिती का निर्माण झाली असावी? असा एक प्रश्न पडतो. परवा सुट्टीत एका खेडेगावी गेलो असता, एक शेतकरी उदास होऊन बसला होता. त्याला विचारलं की, कोणती समस्या आहे? त्याचं उत्तर ऐकून नवल तर वाटलं! परंतु शंकांचं काहूर माजलं. त्या शेतकऱ्याने उत्तर दिलं, आमच्या २० एकर शेतात १३ बोअर मारले परंतु एकाही बोअरला पाणी लागलं नाही.' भरपूर पैसा वाया गेला आणि पाणीपण नाही. आज शेतीसाठी पाणी नाही कालांतराने वापरण्यासाठी, पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळणार नाही. 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे प्रत्येक पाण्याचा थेंब महत्त्वाचा आहे. म्हणजे जीवन आहे'.   

"व्यवसाय शिक्षण काळाची गरज " essay in marathi | मराठी निबंधलेखन

" व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  वैचारिक मराठी निबंध " व्यवसाय शिक्षण काळाची गरज "  हा एक कल  वैचारिक निबंध   आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " व्यवसाय शिक्षण काळाची गरज " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे   व्यवसाय शिक्षण काळाची गरज      भारत या आपल्या महान देशाला लोकसंख्येच्या विस्फोटाने घेरले आहे. बेकारी, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक युवावर्गाला भेडसावत आहे. सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे लागलेला आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झालेली आहे. एकीकडे गुणवंतांची खाण आहे तर दुसरीकडे अज्ञानाचा अंधार आहे; मार्गदर्शनाचा अभाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात व्यवसायाच्या माहितीचाच अभाव आहे. आजकाल शिक्षणातूनच व्यवसाय शिक्षणावर भर दिला जात आहे याचे ज्ञान प्रत्येकास पाहिजे. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान बनले. विविध व्यवसायांना चालना मिळाली, ग्रामीण भागात बारा बलुतेदार आपल्या व्यवसायातून निर्माण झाले आणि आज व्यवसाय निवडीची समस्या युवा पिढीसमोर उभी आहे. कोणत

वाचन एक छंद essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक निबंध

  वाचन एक छंद  वैचारिक मराठी निबंध वाचन एक छंद "  हा एक कल  वैचारिक निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " वाचन एक छंद " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे.   वाचन एक छंद निबंध      'मला एखादे छानसे पुस्तक किंवा त्यातील उतारा वाचल्याशिवाय झोपच येत नाही', सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली झाली असे वाटत नाही. अशा प्रकारची मनोगते आपण ऐकतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. त्यापैकी 'वाचन' हा माझा छंद आहे.  माणसाच्या या महासागरात प्रत्येक जण आपापल्या छंदाची जोपासना मोत्याप्रमाणे करत असतो. प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच, परंतु इतर छंदापेक्षा 'वाचन' हा छंद मला आईने सांगितलेल्या कथांमुळे आवडू लागला. आईने वाचनाची सवय लावली, आणि मी वाचतच आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगती होत असते ती वाचनामुळे. सुसंस्कारी, सत्शील, चांगल्या चारित्र्याच्या जीवन

"अंध:श्रद्धा एक शाप" essay in marathi | मराठी निबंधलेखन | वैचारिक मराठी निबंध

   " अंध:श्रद्धा एक शाप "   वैचारिक मराठी   निबंध                                      " अंध:श्रद्धा एक शाप " हा एक कल  वैचारिक   निबंध  आहे. वैचारिक निबंधात आपल्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करायचे असते, त्या गोष्टीची गरज सांगायची असते. खाली दिलेला " अंध:श्रद्धा एक शाप " हा  निबंध  वैचारिक निबंधाचे एक उदाहरण आहे. अंध:श्रद्धा एक शाप       आपला भारत एक महान देश आहे. आपल्या देशाची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. आपल्या देशाचा इतिहास फार प्राचीन आहे. आपल्या या विशाल देशात रूढी, प्रथा, परंपरा, सणवार, उत्सव, विविध प्रांतात, विविध पध्दतीने साजरे केले जातात. विविध जातिधर्मातील पध्दती वेगवेगळ्या आहेत. यातूनच भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवनपध्दती विकसित झालेली आहे.  मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याच्या मूलभूत गरजा समाजात  भागविल्या जातात आणि त्याच्या इतर गरजांची पूर्तताही समाजातच पूर्ण होत असते. परंतु प्रत्येक मनुष्य हा कर्तृत्वाने, प्रयत्नाने, बळाने, पैशाने, बुद्धीने परिपूर्ण असतोच असे नाही. बऱ्याच वेळेस त्याने केलेल्या कार्यात यशाच्या ऐवजी त्यास अपयश जेंव्हा