Skip to main content

Posts

Showing posts with the label संतांची शिकवण

"संतांची शिकवण" essay in marathi | मराठी निबंधलेखन |

  संतांची शिकवण   मराठी निबंध संतांची शिकवण  हा एक अत्यंत महत्त्वाचा  निबंध  आहे. खूप वेळा मुख्य परीक्षेतसुद्धा ह्यावर निबंध विचारला गेला आहे. खाली  संतांची शिकवण  या विषयावर विस्तारितपणे  निबंध  दिला आहे. नेमके मुद्दे व  संतांनी आपल्याला काय शिकवण  दिली आहे  हे सांगण्याचा पुर्णपणे प्रयत्न केला आहे.   संतांची शिकवण मराठी निबंध महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. “संत महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे विचार ऐकावे हाच सापडे बोध खरा"   संत म्हणजे केवळ देवाचे भजन करणारा एक भक्त असतो असे नाही तर सत् असे कार्य, चांगले कार्य करणारा. हे कार्य सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक असे असते. संतांच्या साहित्याची देणगी मराठी रसिकाला, साहित्यिकाला, वाचकाला, भक्ताला मिळालेली आहे. साहित्याच्या सानिध्यात सामान्य माणूस जर विचाराने वावरायला लागला तर निश्चित त्याच्या वैचारिक क्षमतेत परिसाचा स्पर्श झाल्याचे आढळेल. संत साहित्य हे माणसात सांस्कृतिक श्रीमंती आणते. जीवनाला उजाळा देणारी सुंदरता, समृद्धी देणारी, उत्तमोत्तम विचार देऊन मन सुयोग्य मार्गावर नेणारी संतांची