Skip to main content

Posts

Showing posts with the label हुंडा एक अनिष्ठ प्रथा

हुंडा एक अनिष्ठ प्रथा essay in marathi | मराठी निबंधलेखन

  हुंडा एक अनिष्ठ प्रथा मराठी निबंध "हुंडा एक अनिष्ठ प्रथा"  ही प्रथा पूर्वी पासून आपल्या भारतात आहे. लग्न म्हटलं की हुंडा हा प्रकार आलाच असे समजा. आज याच विषयावर विस्तारितपणे खाली  निबंध  दिलेला आहे. सगळे मुद्दे घेण्याचा प्रयत्न केला आहे.    हुंडा एक अनिष्ठ प्रथा निबंध  वर्तमानपत्र उघडले की, एखादी तरी हुंडाबळी ठरलेल्या स्त्रीची करुण कहाणी सांगणारी बातमी दिसते, आणि मन सुन्न होतं. दररोज कुठेना कुठे हुंडा घेण्यावरून वा देण्यावरून वादविवाद, त्यातून संघर्ष, संघर्षातून खून, मारामाऱ्या अशा घटनांची साखळीच दृष्टीस पडते. म्हणूनच की काय मुलगी झाली म्हटलं की आई-बापापासून इतर सर्व-जणच नाकं मुरडतात. मुलाचं स्वागत ज्या उत्साहानं, आनंदानं होतं तसं मुलीचं स्वागत होत नाही. सु शिक्षित असो वा अशिक्षित, दोन्ही वर्गात मुलींची हेळसांड होताना दिसते. जन्मल्या जन्मल्या मुलगी परक्याचं धन आणि मुलगा मात्र वंशाचा दिवा अशी मनाची धारणा असलेले माता पिता अज्ञानी, अविचारी असतात. मुलीला कमी लेखणे आणि मुलाला अति महत्त्व देणे यातूनच मुलींच्या भ्रूणहत्येपासून हुंडाबळीपर्यंत हत्येचे प्रमाण वाढलेले आहे.   हुंडा म्ह