Skip to main content

Posts

Your 13th brings a new adventure : Happy 13th Birthday My dear Daughter :

  Your 13th brings a new adventure Happy 13th, my dear! This very special coming of age birthday sees you wave goodbye to childhood and embark on your journey into adulthood! I’m wishing you every happiness and all the success in the world as you welcome this new adventure!

Happy 13th birthday to my perfect kid

  Happy 13th birthday to my perfect kid Happy 13th birthday to my perfect kid! Of course, as your parent, I only see sunshine flow from you but to me, you are simply the sweetest kid around! I just hope that now you’re a teenager all of that doesn’t change!

अलंकार (मराठी व्याकरण) शब्दालंकार,अर्थालंकार

  अलंकार (मराठी  व्याकरण  ) अलंकार याचा अर्थ दागिना, दागिना हा शब्द म्हटला की स्त्री आणि तिचं सौंदर्य आणि त्या सौंदर्यात दागिन्याने टाकलेली भर हे दृश्य समोर येते. एखादी स्त्री खूप सुंदर असली तरी ती जर सुंदर, मोहक अशा दागिन्यांनी नटलेली दिसली तर ती आणखीनच मोहक दिसते तद्वत भाषा सुद्धा शब्दांच्या आणि अर्थाच्या दृष्टीने समृद्धपणे सजविली तर ती खूपच आकर्षक दिसते. भाषेचे दोन अलंकार आहेत. १) शब्दालंकार २) अर्थालंकार १)  शब्दालंकार  - शब्दाच्या वापरामुळे शब्दचमत्कृती घडत असते तेथे शब्दालंकार होतो. उदा. मातीच्या गोळ्याला देते आकार हाडा मासाच्या धडावर करते संस्कार बाळाच्या प्रेमाला करते साकार आई थोर तुझे उपकार । या ओळींमधून यमक दिसून येतो त्यामुळे ही रचना आकर्षक वाटते. २)  अर्थालंकार  - अर्थालंकारात अर्थचमत्कृती असते. अर्थामुळे रचनेचे सौंदर्य खुलून दिसते. उदा. गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात । शब्दालंकार व अर्थालंकाराचे प्रकार अभ्यासू. १. दृष्टांत :-  व्याख्या : एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा

"मी पाहिलेली जत्रा" वर्णनात्मक मराठी निबंध | essay writing in marathi

 मी पाहिलेली जत्रा वर्णनात्मक मराठी निबंध मी पाहिलेली जत्रा निबंध   सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापासून जवळच्याच अंतरावर माझ्या आजी चे गांव आहे. तस गांव बरंच प्रगत आहे. मी बर्याच वेळा मामा-मामी, आजी-आजोबांना भेटायला जवळ्याला जाते आणि जत्रेला तर दरवर्षी जातेच. जवळ्याच जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली ही जत्रा जरी मुस्लिम बांधवाचा खास पर्व असला तरी संपूर्ण गावातून तसेच अजुबाजुच्या खेडयामधुन सर्व जातिधर्माचे भाविक या जत्रेला हजेरी लावतात.    जत्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे अतिशय अप्रतिम कव्वाली चे सादरीकरण. मला ते खूप आवडते. गाणारा जेवढ़या श्रद्धेने गातो, ऐकनारा तेवढाच भावूक होतो. जत्रेसाठी जाताना आज्जी व मामी देवासाठी माखमालीचे चादर, अगरबत्ती, फुले असे पूजेचे साहित्य घेतात. सैलानी देवाला चादर अर्पण केल्याने सर्व कष्ट, दुःख कमी होतात अशी आमच्या आज्जींची श्रद्धा आहे आणि घरातील कोणीही तिच्या श्रद्धेला, भावनेला दुखवत नाही. आम्ही मुले तर जत्रेत खूप खूप मज्जा करतो. आईस्क्रीम, कुल्फी, पाणी पुरी, मिठाई, चटकदार भेळ, गोड लाल/हिरव्या मिरच्या, रेवडी, विविध प्रकारचे सरबत, खूप खूप खाण्याचे पदार्थ असतात.

माझा आवडता ऋतु (वसंत ऋतु) मराठी निबंध | Essay writing in Marathi

  माझा आवडता ऋतु (वसंत ऋतु) मराठी निबंध वसंत ऋतू निबंध    महाशिवरात्री होऊन गेली की होळी, रंगपंचमी या सणाचे वेध लागतात. थंडी पार संपुन उन्हाळा जाणवतो. वसंत व ग्रीष्म हे उन्हाळ्याचे दोन ऋतु.    या दिवसात दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका फारच असतो. त्यामुळे शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे. शक्यतो आपल्या कामाचे नियोजन असे करावे की कडक उन्हाच्या वेळी बाहेर फिरावे लागणार नाही, बाहेर फिरणे आवश्यक असले तर डोक्यावर छत्री,टोपी,रुमाल,पदर असे काहितरी आच्छादन असणे गरजेचे आहे.    उन्हाळाच्या दिवसात घाम खुप येतो त्यामुळे तो टिपला जाईल असे सुती कपडे वापरणे चांगले असते. कृत्रिम धाग्यांच्या कपड्यांनी घाम टिपला जात नाही. आणि तो तसाच अंगावर राहिल्याने निरनिराळ्या त्वचेचे विकार, पुराच्च उष्णे, पामोळे येणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. सुती कापड सर्वच ऋतुत हितकर असते. उन्हामुळे घाम खुप येतो आणि शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर टाकले जाते. त्यामुळे तहान खुप लागते. पाणी प्यावेसे वाटते. बर्फ टाकुन थंड केलेले किंवा फ्रीजमपील पाणी पिऊ नये, असे पाणी शरीरातील उष्णता जास्त बाढवते. म्हणुन परत कोरडे पडुन पुन्हा पुन्

माझा आवडता ऋतु (शिशिर ऋतु) essay in marathi | मराठी निबंधलेखन

 माझा आवडता ऋतु (शिशिर ऋतु) मराठी निबंध माझा आवडता ऋतु निबंध  (शिशिर ऋतु)     नुकतीच संक्रांत होऊन गेली. तिळगुळ देण्या-घेण्याने नवे स्नेहसंबंध जोडले गेले. तिळगुळ, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, तुप, लोणी यांचे महत्व मागील महिन्यात आपण पाहिले. या दिवसांत लहान मुलांना बोरन्हान घालण्याची प्रथा आपल्याकडे आहे. यात चुरमुऱ्याचे, गाजराचे तुकडे, उसाचे करवे, बोरे, हलवा, हरभ-्याचे घाटे हे सगळे मिसळुन त्यांनी त्या मुलाला न्हान घालतात.     हे सगळे पदार्थ ह्या दिवसात निसर्ग देतो. निसर्गाच्या उपलब्धीकडे लक्ष वेधणारी आहे. त्या समृध्दीचा आस्वाद घडविणारी बालपणापासुन निसर्ग स्नेही जीवनशैलीचा संस्कार करणारी ही परंपरा किती हृदयस्पर्शी आहे. या ऋतूतील फळे म्हणजे मोरे, आवळे,पेय इ. ही फळे या दिवसांत खावी आवळा बुध्दिवर्धक दृष्टी सुधारणारा रसायन म्हणजे धातुंना बल देणारा, भुक वाढविणारे पचन सुधारणारा सारक अशा सर्व गुणाने संपन्न असतो.    गाजर बीट मुळा यासारख्या कंदवर्गीय भाज्या ही या दिवसांत विशेष सत्वयुक्त असतात. या ऋतुत मिळणारे हरभरे, वटाणे कोवळे असल्याने पचायला हलके असतात. आणि या ऋतुत पचनशक्ती चांगली असल्याने सहज प

माझा आवडता सण (होळी, गुढीपाडवा आणि वटपूर्णिमा) essay in marathi | निबंधलेखन

  माझा आवडता सण (होळी, गुढीपाडवा आणि वटपूर्णिमा)                                                          माझा आवडता सण होळी   वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे होळी थंडी संपुन उष्णता वातावरणात दाढण्याची सुरूवात या दिवसापासून होते. शरीरामधेही उष्णता, थंडाई पिण्याची प्रथा आहे. थंडाईमधे वापरली जाणारी दूध, गुलाबकळी, खसखस, काकडी, बदाम ही द्रव्ये थंड गुणाची व उष्णता कमी करणारी आहेत. तसेच होळीची पूजा करताना होळीमध्ये पुरणपोळी, पैसे, पानसुपारी,खोबरे, कापूर, नारळ, पानगळ मध्ये झडलेला पालापाचोळा, शेणाच्या गोवऱ्या मधे पेटविले जाते. यामध्ये निर्माण होणाऱ्या धूराचा परिणाम वातावरणातील वाढलेल्या कृमिवर होतो. जसे पौराणिक कथेनुसार लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, ढुंढा, पूतना ह्यासारख्या राक्षसांच्या दहणाची कथा आहे.      आयुर्वेदानुसार यांनाच ग्रहबाधा म्हटले आहे. ग्रहबाधा म्हणजे (सध्याचे Virus & Bacteria) यांचे दहण होते. कृषी संस्कृतीतील या सणाचे विशेष महत्व आहे. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्याची प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओव्य